Skipping dinner and cholesterol: रात्रीचं जेवण टाळल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं? डॉक्टरांनी दिलं उत्तर

Surabhi Jayashree Jagdish

कोलेस्ट्रॉल

बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आजकाल कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या अनेकांमध्ये दिसून येते. विशेषतः रक्तातील LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल जास्त असल्यास हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.

Lower LDL cholesterol | saam tv

फक्त रात्रीचं जेवण बंद केल्याने LDL कमी होत नाही

रात्री जेवण न केल्याने दिवसभरातील एकूण कॅलरी कमी झाल्या तर काही लोकांना वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. मात्र केवळ जेवणाची वेळ बदलल्यामुळे LDL कोलेस्ट्रॉल कमी होतं, असा ठोस निष्कर्ष नाही.

Skipping dinner | saam tv

ताटात काय आहे हे महत्त्वाचं

LDL वाढण्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटचं जास्त सेवन हा महत्त्वाचा आहाराशी संबंधित घटक आहे. त्यामुळे रात्रीचं जेवण टाळण्यापेक्षा तूप, लोणी, फॅटी मांस आणि फुल-फॅट डेअरीसारख्या पदार्थांचं प्रमाण कमी करणं अधिक उपयुक्त ठरू शकतं.

Dinner and LDL | saam tv

भूक लागली असेल तर जेवण पूर्णपणे टाळू नका

रात्री जेवण टाळल्यामुळे दुसऱ्या दिवशी जास्त भूक लागून काहीजण गरजेपेक्षा अधिक खाऊ शकतात. अशा परिस्थितीत दिवसभरातील एकूण कॅलरी कमी होण्याऐवजी उलट वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार निवडणं योग्य ठरतं.

Cholesterol diet | saam tv

फायबरयुक्त आहार

ओट्स, कडधान्यं, फळं आणि काही भाज्यांमध्ये आढळणारं सोल्युबल फायबर LDL कमी करण्यास मदत करू शकतं. त्यामुळे फक्त रात्रीचं जेवण टाळण्याऐवजी दिवसभराच्या आहारात फायबरयुक्त पदार्थ वाढवणं अधिक महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सॅच्युरेटेड फॅटचं सेवन कमी केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी अधिक चांगला परिणाम मिळू शकतो.

Fiber and LDL | saam tv

व्यायाम

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारासोबत नियमित शारीरिक हालचाल करणंही महत्त्वाचं आहे. नियमित व्यायामामुळे LDL आणि ट्रायग्लिसराइड्स कमी होण्यास तसंच HDL म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल सुधारण्यास मदत होऊ शकते.

Oats for cholesterol | saam tv

डॉक्टरांचा सल्ला घ्या

कोलेस्ट्रॉल वाढण्यामागे केवळ आहार किंवा जीवनशैली कारणीभूत असेलच असं नाही, तर आनुवंशिकता आणि इतर आरोग्यविषयक कारणांचाही त्यात सहभाग असू शकतो. त्यामुळे रिपोर्टमध्ये LDL जास्त आढळल्यास स्वतःहून रात्रीचं जेवण बंद करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं.

Ghee and cholesterol | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Exercise and cholesterol | saam tv

Milk: दूध प्यायल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का?

Healthy lifestyle | saam tv
येथे क्लिक करा