Surabhi Jayashree Jagdish
शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास पायांमध्ये सतत वेदना जाणवू शकतात. ही वेदना हळूहळू वाढत जाते आणि पाय जड झाल्यासारखे वाटू शकते. काही लोकांमध्ये हा त्रास पायांपासून मांड्यांपर्यंतही पसरू शकतो.
कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे टाचेत सतत वेदना राहू शकतात. पायांच्या बोटांमध्ये गोळे येणं किंवा आकडी येण्याचा त्रासही होऊ शकतो. विशेषतः रात्री झोपताना ही समस्या अधिक तीव्र जाणवते.
थोडं अंतर चालल्यानंतरही पायांमध्ये वेदना सुरू होऊ शकतात. विश्रांती घेतल्यानंतर काही प्रमाणात आराम मिळतो, पण पुन्हा चालू लागल्यावर वेदना परत जाणवतात. हे पायांपर्यंत पुरेसा रक्तपुरवठा न होण्याचे एक संभाव्य लक्षण असू शकते.
पायांचे तळवे किंवा संपूर्ण पाय नेहमीपेक्षा अधिक थंड वाटू शकतात. हा त्रास रात्रीच्या वेळी अधिक जाणवू शकतो. रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे असे होण्याची शक्यता असते.
पायांच्या त्वचेचा रंग फिकट, निळसर किंवा वेगळा दिसू शकतो. हा बदल विशेषतः शरीराच्या खालच्या भागात स्पष्टपणे जाणवू शकतो. रक्ताभिसरणातील अडथळ्यामुळे अशी लक्षणं दिसू शकतात.
काही वेळा कोणतेही मोठं कारण नसताना पायात अचानक तीव्र वेदना सुरू होऊ शकतात. पाय खूप जड झाल्यासारखे किंवा ताण आल्यासारखं वाटू शकतं. अशी लक्षणं वारंवार दिसत असल्यास वैद्यकीय तपासणी करणं आवश्यक आहे.
उच्च कोलेस्ट्रॉलला अनेकदा 'सायलेंट किलर' म्हटलं जातं. कारण सुरुवातीला त्याची स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत. वरीलपैकी कोणतीही लक्षणं सतत जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोलेस्ट्रॉल आणि रक्तवाहिन्यांची तपासणी करून घ्यावी.