BP Medicines: BP नॉर्मल आला म्हणून गोळी बंद केली? ठरू शकतं महागात; डॉक्टरांनी सांगितलं हार्ट अटॅकचा धोका वाढतो

Blood Pressure Medicines: बीपी नॉर्मल झाल्यानंतर स्वतःहून रक्तदाबाची औषधं बंद करणं धोकादायक ठरू शकतं. औषधं बंद केल्यावर बीपी पुन्हा वाढण्याचा आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. बीपीची औषधं कधी कमी किंवा बंद करता येतात, डॉक्टरांकडून जाणून घ्या.
BP Medicines
BP Medicinessaam tv
Published On: 

आजच्या धावपळीच्या जीवनात उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशरची समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतेय. विशेष म्हणजे आता कमी वयातही अनेकांना बीपीचा त्रास होताना दिसतोय. ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टर गरजेनुसार औषधं सुरू करतात. मात्र औषधं घेतल्यानंतर बीपी नॉर्मल झाला की काही जण डॉक्टरांचा सल्ला न घेता गोळ्या बंद करतात.

मात्र अचानक अशी औषधं घेणं बंद करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं का? यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो का? याबाबत सर गंगाराम रुग्णालयाचे वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रजत मोहन यांनी माहिती दिलीये.

डॉ. रजत मोहन यांनी आजतकशी बोलताना सांगितलं की, एखाद्या व्यक्तीचा बीपी बराच काळ वाढलेला राहिला तर त्याचा परिणाम हृदयावर होऊ शकतो. त्यामुळेच बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टर औषधं सुरू करतात. मात्र प्रत्येक वेळी बीपी वाढला म्हणून लगेच औषधं सुरू केली जात नाहीत. जेव्हा बीपी वारंवार वाढलेला राहतो आणि खाण्यापिण्यात बदल, व्यायाम त्याचप्रमाणे जीवनशैलीत सुधारणा करूनही तो नियंत्रणात येत नाही. त्यावेळी डॉक्टर औषधं सुरू करण्याचा निर्णय घेतात.

BP Medicines
Heart attack symptoms: हार्ट अटॅक आला की शरीरात नेमकं काय घडतं? डॉक्टरांनी दिलेल्या माहितीवरून वेळीच धोका ओळखा

प्रत्येकाला लगेच बीपीची गोळी लागतेच असं नाही

डॉ. रजत मोहन यांच्या मते, बीपीची औषधं सुरू करायची की नाही, हा निर्णय डॉक्टर घेतात. एकदाच बीपी जास्त आला म्हणून स्वतःहून औषध सुरू करू नये. डॉक्टर काही काळ बीपीच्या रीडिंगकडे लक्ष ठेवण्यास सांगू शकतात. वेगवेगळ्या दिवशी अनेक वेळा बीपी वाढलेला दिसत असेल, तर डॉक्टर औषधं सुरू करण्याचा सल्ला देऊ शकतात.

बीपीची औषधं आयुष्यभर घ्यावी लागतात का?

बीपीची औषधं सुरू झाली म्हणजे ती कायमच घ्यावी लागतात असं प्रत्येक वेळी होत नाही. जसं की, एखाद्या व्यक्तीचं वजन खूप जास्त असेल आणि वजन कमी केल्यानंतर त्याचा बीपी नॉर्मल येत असेल तर काही परिस्थितीत डॉक्टर औषधं कमी करू शकतात किंवा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

BP Medicines
Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

तसंच, एखाद्या व्यक्तीचा आहार आणि जीवनशैली योग्य असेल आणि त्याचा बीपी सातत्याने नियंत्रणात राहत असेल तरी काही प्रकरणांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं कमी किंवा बंद केली जाऊ शकतात. मात्र हा निर्णय रुग्णाने स्वतः घेऊ नये. औषधं कमी करायची किंवा बंद करायची की नाही, हे डॉक्टरच ठरवतात.

बीपीची औषधं मध्येच बंद केल्यास काय होऊ शकतं?

डॉक्टरांनी बीपीची औषधं सुरू केली असतील तर ती स्वतःच्या मनाने बंद करू नयेत, असं डॉ. रजत मोहन सांगतात. अनेक जण बीपी सामान्य आल्यानंतर गोळी घेणं बंद करतात. मात्र औषधं बंद केल्यानंतर बीपी पुन्हा वाढू शकतो.

BP Medicines
World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

बीपीची औषधं मध्येच बंद करणं आणि त्यानंतर बीपी बराच काळ वाढलेला राहणं यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. यासोबतच हार्ट अटॅक येण्याचा धोकाही वाढू शकतो. त्यामुळे बीपी सामान्य आला म्हणून औषधं स्वतःहून बंद न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com