
Advantages Of Smart Watch On Health: गेल्या काही वर्षांमध्ये "स्मार्ट वेअरेबल" या स्मार्ट उपकरणांचे (स्मार्ट वॉच, स्मार्ट रिंग्स, स्मार्ट बँड इ.) मार्केट तेजीत सुरु आहे. अॅपल, सॅमसंग, हुवाई, फिटबीट आणि ऑरा यासारख्या कंपन्यांनी मार्केटमध्ये आपली एक वेगळीच ओळख प्रस्थापित केली आहे.
स्मार्ट डिव्हाइसेसची ब्रँडिंग केवळ जेन झेड द्वारेच नाही तर, तरुण एक्झिक्युटिव्ह ते उद्योजकांपर्यंत तसेच गृहिणींना देखील केली आहे. या "हेल्थ प्रमोटिंग डिव्हाईस" ची क्रेझ सर्वच स्तरांमध्ये दिसून येत आहे. परंतु ही उपकरणे खरोखरच उपयुक्त ठरताय का ? याचे विश्लेषण इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्टचे डॉ कौशल छत्रपती यांनी या लेखाच्या माध्यमातून दिले आहे. जाणून घेऊया सविस्तर
स्मार्ट वेअरेबलचे कार्य
1. या इलेक्ट्राँनिक गँझेट्सचा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्या महत्वाच्या अवयवांचे कार्य (हृदयाची गती, ऑक्सिजन सॅच्युरेशन, किती पावले चाललो, कॅलरीज (Calories) किती बर्न झाल्या, दिवसातून किती वेळ व्यायाम केला इ.) याचे निरीक्षण केले जाते.
2. अलार्म वाजवणे आणि एखादी घटना घडल्यावर आधी संपर्क साधलेल्या फोन नंबरशी पुन्हा संपर्क साधणे.
3. तुमच्या आरोग्याची अधिक माहीती देणे, व्यायाम (exercise) करण्यास प्रोत्साहित करण्याचे काम करते.
वर दिलेल्या पहिल्या भागावर बहुतेक वेअरेबल उपकरणे चांगले काम करतात. बहुतेक आरोग्य संबंधी माहिती ही अगदी अचूक असते. युरोपियन हार्ट जर्नल: डिजिटल हेल्थमध्ये 83,000 लोकांवर एक मोठा अभ्यास करण्यात आला यांनी त्यांच्या स्मार्ट घड्याळातून 15 सेकंदाचा ईसीजी घेऊन तो प्रकाशित करण्यात आला. त्यातून हे लक्षात आले आहे की सातत्याने आढळून येणारे अतिरिक्त ठोके हृदयासंबंधी जोखीम दर्शवितात. जीवनशैलीतील बदल तसेच योग्य उपायांमुळे हृदय विकाराच्या (Heart Attack) वाढीस प्रतिबंध करता येऊ शकतो.
एट्रियल फायब्रिलेशन : एक अनियमित लय ज्यामुळे हृदयामध्ये गुठळ्या होऊ शकतात आणि याचे स्मार्ट घड्याळ ईसीजीद्वारे सहज निदान केले जाते. हा एरिथमिया बहुतेकांमध्ये लक्षणे नसलेला असू शकतो आणि स्मार्टवॉचचा अवलंब निश्चितपणे त्याचा शोध आणि उपचारांना कारणीभूत ठरला आहे.
हृदयविकाराचा झटका, आजच्या घडीला स्मार्टवॉचच्या वापराने निदान केला जात नाही परंतु आजही स्मार्टवॉच ईसीजीवर हृदयविकाराचे निदान केले जाऊ शकते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे स्मार्टवॉच भविष्याच ईसीजी अधिक माहितीपूर्ण ठरु शकतो आणि दिवसेंदिवस तंत्रज्ञानातील प्रगती पाहता येत्या काही वर्षांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे निदान ईसीजीच्या आधारे केले जाईल.
अॅपलच्या घड्याळात फॉल डिटेक्शन सॉफ्टवेअर आहे. अॅपल वॉचच्या या वैशिष्ट्याने अनेकांचे जीवन वाचवले आहे. यामुळे, हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये अनियमित हृदयाचे ठोके किंवा झडपांच्या आजारांमुळे होणारी घसरण दिसून आली आहे. ही खरोखरच एक जीवन वाचवणारी प्रक्रिया आहे.
डेटा कोलाटिंग हा मनुष्यामधील वर्तन सुधारणेचा एक महत्त्वाचा पैलू ठरत आहे. परंतु केवळ डिजिटल हेल्थ ट्रॅकर्स (जसे की स्मार्टवॉच आणि बँडमध्ये) व्यक्ती प्रत्यक्षात किती चालते याची खात्री देऊ शकतात. दैनंदिन स्टेप टार्गेट ठेवल्याने उदाहरणार्थ, व्यायामाचे प्रमाण मोजण्यायोग्य बनते आणि त्यामुळे किती कॅलरीज खर्च याचे गणित करता येते.
या उपकरणांवरील प्री-फेड सॉफ्टवेअरच्या मदतीने पोहणे, सायकलिंग आणि मसल्स स्ट्रेथनिंग प्रशिक्षण यासारखे इतर व्यायाम देखील अचूकपणे मोजले जातात. स्मार्टवॉचवर पूर्णपणे 10,000 पावले चालणे म्हणजे हा मधुमेहाच्या रुग्णासाठी एक प्रोत्साहात्मक बाब आहे. नवीन घड्याळे ब्लड प्रेशर इत्यादी सारख्या अधिक अत्याधुनिक पॅरामीटर्सचे मोजमाप करतात. 24 तासांच्या ईसीजी आणि बीपीची नोंद दिवसभरात आणि रुग्णाच्या आरोग्यावर शक्य तितक्या अचूकपणे निरीक्षण करते. स्मार्टवॉचच्या अत्याधुनिक वैशिष्ट्यांमुळे खूप फायदा होईल.
या वेअरेबलचे काही तोटे देखील आहेत. हा स्मार्ट डिव्हाइस चुकीच्या पध्दतीने हाताळल्यास तोटा होऊ शकतो. स्मार्टवॉच हा वैद्यकिय सेवेला पर्याय नाही. परंतु, भारतीय मानसिकता आणि डॉक्टरांबद्दलचा सामान्य अविश्वास तसेच सोशल मीडियाच्या प्रभावाने डॉक्टरांच्या हस्तक्षेपाशिवाय स्मार्टवॉच डेटावर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात स्मार्टवॉचमुळे आरोग्य विमा पॉलिसी नाकारता येण्याची शक्यताही अधिक दिसून आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.