कोमल दामुद्रे
काही मुलं वयाच्या तुलनेत जास्त मोठी किंवा वयाच्या हिशोबानं बरोबर दिसतात तर काहीजण वाढत्या वयातही आपली उंची आणि तब्येतीमुळे लहान दिसून येतात.
उंची कमी असल्यानं मुलांच्या आत्मविश्वासावरही परिणाम होतो.
तज्ज्ञांच्यामते १८ वर्ष वयोगटात मुलाची उंची ४ टक्के दरानं वाढते. त्यानंतर हळूहळू मुलांची उंची वाढत जाते.
१५ वर्ष वयोगटात मुलांची उंची वाढण्याचा वेगही कमी होतो.
रिपोर्टनुसार चांगला आहार आणि आयुर्वेदीक उपायांनी १६ वर्ष वयोगटात मुलांची उंची वाढवण्यास मदत होऊ शकते.
शरीराच्या चांगल्या वाढीसाठी हेल्दी डाएटची आवश्यकता असते. दूध, फळं, ताज्या भाज्या आणि कार्ब्स या पदार्थांचा आहारात समावेश असायला हवा.
उंची वाढवण्यासाठी नियमित योगा करायला हवा. योगाभ्यास शरीरातील रक्त संतुलन सुधारते.
शरीराच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी चांगली आणि अखंड झोप आवश्यक आहे. झोप न मिळाल्याने शारीरिक विकासही थांबतो.
चांगल्या उंचीसाठी, शरीराची स्थिती योग्य असावी. चालणे, बसणे आणि झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे उंचीची वाढ थांबते.
व्यायाम ही नैसर्गिक पद्धत उंची वाढवण्यासाठीही प्रभावी आहे. 14-15 वर्षे वयापासून मुलांना नियमित व्यायाम करायला लावा.