
Chronic Stress Causes Heart Health Issues: हृदयाच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी तणावमुक्त राहणे गरजेचे आहे. सर्वच वयोगटातील लोकांमध्ये अँक्झायटी ही एक सामान्य समस्या आहे. वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनातील तणाव, आरोग्याच्या समस्या आणि जवळच्या व्यक्तीचा मृत्यूमुळे अँक्झायटी वाढू शकते.
यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर (Mental Health) परिणाम करु शकते. ही चिंता तुमचा रक्तदाब आणखी वाढवू शकते आणि हृदयविकाराच्या झटक्यास आमंत्रण देऊ शकते. नैराश्य आणि हृदयविकाराचा एकमेकांशी संबंध अनेक दशकांपासून ओळखला जातो.
उदासीनतेमुळे हृदयविकार (Heart attack) वाढू शकतात हे अनेक अभ्यासांद्वारे सिध्द करण्यात आले आहे असे मत मुंबईचे कार्डियाक सर्जन सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे डॉ बिपीनचंद्र भामरे यांनी मांडले आहे. चिंतेमुळे आपल्याला हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो याविषयी जाणून घेऊया
1. अँक्झायटीमुळे हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो का?
चिंतेमध्ये सतत ताण (Stress) घेणे, पॅनिक डिसऑर्डर आणि पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) यांचा समावेश होतो. चिंतेमुळे भीती निर्माण होते. एखाद्याला पोटाची समस्या, डोकेदुखी, हृदय गती आणि उच्च रक्तदाब देखील जडू शकतो. कालांतराने, चिंतामुळे कार्डिया आणि उच्च रक्तदाब होतो. उपचार न केलेल्या रक्तदाबामुळे स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो.
हृदयाच्या समस्या तुम्हाला चिंताग्रस्त करू शकतात. एखाद्याला हृदयविकाराच्या झटक्याने पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) होऊ शकतो. पीटीएसडी असल्यास डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या. तुम्हाला तणावापासून मुक्त होण्यास मदत करणार्या थेरपी किंवा सपोर्ट ग्रुप्सचा फायदा होऊ शकतो.
2. तणावमुक्त राहण्यासाठी हे नक्की करा
चिंता आणि हृदयाच्या समस्येंवर त्वरित उपचार करा
व्यायामामुळे कोरोनरी धमनीमधील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होईल, कोर्टिसोलची पातळी कमी होते, मुड चांगला होतो आणि रक्तदाब कमी होतो.
यासाठी दररोज 30 मिनिटे न चुकता व्यायाम करा.
जीवनशैलीतील चांगले बदल करा, कमीतकमी 8 तास चांगली झोप घ्या.
झोपेच्या कमतरतेमुळे देखील हृदयाच्या समस्या देखील उद्भवू शकतात त्यामुळे झोप पूर्ण होईल याची काळजी घ्या.
योग आणि ध्यान करून तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.
वाचन करणे, गाणी ऐकणे, बागकाम करणे आणि नवीन कौशल्य किंवा भाषा शिकणे यासारखे छंद जोपासू शकता ज्यामुळे तणावापासून दूर राहण्यास मदत होऊ शकते.
शिवाय, तुम्ही काय खाता याकडे लक्ष द्या. आहारात ताजी फळे, भाज्या,सर्व प्रकारचे धान्य, कडधान्ये, शेंगा आणि मसूर यांचा समावेश करा आणि आहाराच्या चांगल्या सवयींचे पालन करा.
जंक फूड, तेलकट, हवाबंद डब्यातील पदार्थ आणि प्रक्रिया केलेले अन्नाचे सेवन टाळा.
जर तुम्ही अनेकदा तणावग्रस्त आणि चिंताग्रस्त असाल तर फक्त औषधोपचार आणि थेरपी घ्या. असे केल्याने हृदयाला आणखी नुकसान होण्यापासून वाचवता येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.