Apple Side Effects : दररोज सफरचंद खाणं 'या' व्यक्तींना ठरू शकतं घातक, कारण...

Health Tips : आपल्यापैंकी अनेकांना सफरचंद खाणे मोठ्या प्रमाणात आवडत असते. मात्र दररोज जास्त प्रमाणात सफरचंद खाणे देखील आरोग्यासाठी अत्यंत नुकसानदायक ठरु शकते.
Health Tips
Apple Side EffectsSaam Tv
Published On

चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकजण अनेक फळांचा आहारात समावेश करत असतो. त्यातील सफरचंद या फळांचा जास्त प्रमाणात समावेश अनेकजण करत असतात. तुम्ही ऐकलेच असेल जर दररोज एक सफरचंद खाल्ल्याने रुग्णालयाती पायरी चढावी लागणार नाही, असे बोलले जाते.

Health Tips
Health Tips : दिवसभर उपाशी राहून रात्री 'ओव्हरइटिंग' करणं कितपत योग्य? वाचा 'या' टिप्स, आजच सोडा सवय

सफरचंदात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन तसेच फायबर, लोह शिवाय पोटॅशियम , अँटीऑक्सिडंट्स यांसारखे अनेक पोषक घटक असतात. हे सर्व पोषक(nutrients) घटक चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? दररोज सफरचंद खाणे जरी फायदेशीर असले तरी दररोज सफरचंद जास्त खाणे अत्यंत हानिकारकही ठरु शकेल.चला तर जाणून घेऊयात कोणत्या व्यक्तींनी जास्त प्रमाणात सफरचंद खाने टाळावे.

जास्त प्रमाणात सफरचंद खाण्याचे तोटे

ऍलर्जी - अनेक व्यक्ती असे आहेत ज्यांना सफरचंद खाण्याची ऍलर्जी(allergy) असू शकते. जर अशा व्यक्तींनी सफरचंद खाले तर त्यांना त्वचेवर खाज सुटणे शिवाय पुरळ येणे तसेच सूज येण्याचा अशा समस्या जाणवू शकतात. जर तुम्हालाही अशा समस्या जाणवत असल्यास तुम्ही सफरचंदाचे सेवन करु नये.

लठ्ठपणा- जे व्यक्ती वजन कमी करत आहेत,अशा व्यक्तींनी आहारात सफरचंद या फळाचा समावेश करु नये. सफरचंदमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरी आणि साखरेचे प्रमाण असल्याने ते लठ्ठपणात सफरचंदाचे सेवन करु नये.

अतिसार- ज्या व्यक्तींना अतिसार या आजाराची समस्या असते अशा व्यक्तींनी ही सफरचंदाचे सेवन करु नये. जर अशा व्यक्तींनी सफरचंदाचे सेवन केल्यास अतिसारची समस्या वाढते.

मधुमेह- मधुमेहाची (Diabetes)समस्या असलेल्या व्यक्तींनी सफरचंदाचे सेवन करु नये. सफरचंदाच्या अति सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यात असते.

पचनाची समस्या- पचनसंस्थेसंबंधित काहीही समस्या असलेल्या व्यक्तींनी शक्यतो सफरचंदाचे सेवन करणे टाळावे. सफरचंदाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने व्यक्तीला गॅस तसेच पोटदुखीच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

एका दिवसात किती खावे?

तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की,दिवसभरात सफरचंदाचे किती सेवन करावे. जर तुम्हाला सफरचंद खाण्यास आवडत असल्यास तुम्ही एका दिवसात साधारण एक ते दोनच सफरचंद (Green Apple)खावे. जर यापेकक्षा अधिकचे सफरचंद खाल्ल्यास तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागेल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health Tips
Health Tips : ही समस्या असेल तर पनीर खाऊच नका, अन्यथा...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com