Overeating Disadvantages
Health Tips SAAM TV

Health Tips : दिवसभर उपाशी राहून रात्री 'ओव्हरइटिंग' करणं कितपत योग्य? वाचा 'या' टिप्स, आजच सोडा सवय

Overeating Disadvantages : दिवसभर कामाच्या व्यापात राहिल्यामुळे नीट जेवण होत नाही. यामुळे रात्री ओव्हरइटिंग करताय, वेळीच ही सवय मोडा आणि आपले आरोग्य जपा.
Published on

रात्रीच्या ओव्हरइटिंगचा जास्त परिणाम पचनक्रियेवर होतो. आपली पचनक्रिया मंदावते. त्यामुळे अपचन, ॲसिडीटी, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवतात. दिवसभर नीट जेवण न करता वेळी - अवेळी काही खाल्ल्यामुळे रात्री ओव्हरइटिंग होते. जे आरोग्याला घातक ठरते. गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होताना दिसून येतात. ओव्हरइटिंग थांबवण्यासाठी सर्वात रामबाण उपाय म्हणजे दिवसभराच्या जेवणाचे प्लॅनिंग करा. दिवसभर नीट आहार घेतल्यास संपूर्ण दिवस उत्साह आणि ऊर्जेने परिपूर्ण होतो. तसेच पोटाच्या समस्या उद्भवत नाहीत. सर्वात महत्त्वाचे ओव्हरइटिंग थांबते आणि त्यामुळे वजन देखील वाढत नाही.

ओव्हरइटिंग कसे थांबवावे?

या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि ओव्हरइटिंगची सवय सोडा.

सकाळचा ब्रेकफास्ट

कामाच्या व्यापामुळे तुम्हाला जर खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळता येत नसतील तर दिवसाची सुरूवात तरी पौष्टिक नाश्त्याने करावी. किती घाई असली तरी नाश्त्या केल्याशिवाय घरा बाहेर पडू नये. दिवसभर जास्त ऊर्जा राहील असे पदार्थ नाश्त्याला खावे. दिवसभर काम करता करता आपली एनर्जी कमी होत जाते आणि अशक्तपणा येतो असे होऊ नये, म्हणून सकाळचा नाश्ता नीट करावा.

फायबरयुक्त पदार्थ

आजकाल आपण कामामुळे घरात कमी आणि बाहेर जास्त वेळ असतो. त्यामुळे आपल्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि शरीराला पोषण देखील मिळते. तसेच फायबरयुक्त पदार्थांमुळे पचनक्रिया सुरळीत होते.

पुरेशी झोप

भुकेचा आणि झोपेचा एकमेकांशी संबंध आहे. जर तुमची झोप चांगली झाली असेल तर तुम्हाला जास्त भूक लागत नाही. तसेच जर तुम्ही दीर्घकाळ उपाशी असाल तर एनर्जी कमी होऊन मरगळ येत आणि झोप येऊ लागते. तसेच पुरेशी झोप न झाल्यास मानसिक आरोग्य देखील खराब होते.

Overeating Disadvantages
Shravan Special : श्रावणात शंकराला वाहणारे बेलपत्र त्वचेच्या तक्रारींवर हमखास गुणकारी; देईल मिनिटांत मुलायम, ग्लोइंग स्किन

संध्याकाळचा नाश्ता

दुपारी जेवण न करता डायरेक्ट रात्री जेवण केल्यास पचनक्रियेवर परिणाम होऊन ॲसिडीटीचा धोका वाढतो. त्यामुळे दुपारी जेवण झाले नसले तरी संध्याकाळी हलका - फुलका नाश्ता करावा. यामुळे पोटाला तेवढाच आधार मिळतो आणि शरीराला ताकत मिळते. कामात लक्ष राहते. मेंदूला चांगला रक्त पुरवठा होतो. तसेच दुपारनंतर तुम्ही डायरेक्ट रात्री जेवलात तर ओव्हरइटिंग करता. त्यामुळे आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो.

हायड्रेट राहा

दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी पाणी पिणे महत्त्वाचे आहे. कारण यामुळे संपूर्ण दिवस शरीर हायड्रेट राहून काम करायला एनर्जी मिळते. कधीही जेवणाआधी १५ ते ३० मिनिट आधी पाणी प्यावे म्हणजे जेवताना पोट भरलेले वाटणार नाही. तसेच पचनक्रिया देखील सुरळीत होते. तसेच तुम्ही ओव्हरइटिंग करण्यापासून वाचाल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Overeating Disadvantages
Mobile Addiction : रात्री झोपताना फोन आपल्यापासून किती अंतरावर असावा? वाचा तज्ज्ञांचे मत अन् वेळीच सावध व्हा!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com