Summer Diet: उन्हाळ्यात अपचन; 'या' ४ फायबरयुक्त पदार्थांचा करा आहारात समावेश, पचनक्रिया सुधारण्यास होईल मदत

Health Tips In Summer: सध्या बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.
Summer Diet
Summer Diet Saam Tv

Health Tips In Summer: शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे. सध्या बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर (Health) विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.

उन्हाळ्यात आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंड (Cold) ठेवणं अत्यंत गरजेचं असते.

बेरी

उन्हाळ्यात बेरी हे फळ खावे. ब्लूबेरी, रास्पबेरी, स्ट्रॉबेरी आणि ब्लॅकबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचते.

एवाकॅडो

एवाकॅडो हे फळ जीवनसत्व आणि खनिजांनी समृद्ध आहे. एवोकॅडोमध्ये असलेले फायबर भूक कमी करते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

Summer Diet
Foods For Better Eyesight : सतत चष्म्याचा नंबर वाढतोय? आहारात करा या पदार्थांचा समावेश, दृष्टी सुधारेल!

धान्ये

धान्य खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. धान्यामध्ये फायबर, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, लोह, तांबे आणि मॅग्नेशिअम असतात.

ड्राय फ्रूट्स

ड्राय फ्रूट्स हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. बदाम, पिस्ता आणि अक्रोडचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीर निरोगी राहते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com