Eye care Tips, How To Improve kids eye vision, eye health, Foods For Better Eyesight
Eye care Tips, How To Improve kids eye vision, eye health, Foods For Better EyesightSaam Tv

Foods For Better Eyesight : सतत चष्म्याचा नंबर वाढतोय? आहारात करा या पदार्थांचा समावेश, दृष्टी सुधारेल!

Tips For Eyesight : बदलेल्या जीवनशैलीमुळे कामाचा ताण, कमी झोप, थकवा, सतत स्क्रीन टाइम, मोबाइल - लॅपटॉपचा वापर यामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे अगदी कमी वयात मुलांना देखील चष्मा लावावा लागणार आहे.
Published on

Eye Care Tips :

बदलेल्या जीवनशैलीमुळे कामाचा ताण, कमी झोप, थकवा, सतत स्क्रीन टाइम, मोबाइल - लॅपटॉपचा वापर यामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे अगदी कमी वयात मुलांना देखील चष्मा लावावा लागणार आहे.

डोळे (Eye) कमकुवत होण्यासोबतच डोळ्यातून पाणी येणे, दुखणे, जळजळ होणे आणि डोकेदुखीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जर तुम्हालाही चष्मा असेल तर आहारात काही बदल करायला हवे. ज्यामुळे तुमची दूरदृष्टी सुधारेल तसेच डोळ्यांच्या अनेक समस्यांवर मात करता येईल. जाणून घेऊया आहारात (Food) कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा.

1. आवळा

आवळा हे व्हिटॅमिन (Vitamins) सीचे स्त्रोत आहे. यामध्ये डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्याचे गुणधर्म आहे. आहारात समावेश करण्यासाठी तुम्ही ज्यूस, जाम, लोणचे इत्यादी बनवून सेवन करु शकता.

Eye care Tips, How To Improve kids eye vision, eye health, Foods For Better Eyesight
Kidney Disease Symptoms: ही ५ लक्षणे दिसताच व्हा सावध! असू शकते किडनी खराब, वेळीच घ्या काळजी

2. पालक

पालकमध्ये व्हिटॅमिन ए, ई, झिंक आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते. जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. याशिवाय डोळ्यांसाठी हे खूप फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही पालकची भाजी, सूप इत्यादीचे सेवन करु शकता.

3. कढीपत्ता

कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन ए मुळे आपले डोळे निरोगी राहतात. यासाठी नियमित याचा आहारात वापर करा. ज्यामुळे तुमची दृष्टी सुधारेल.

Eye care Tips, How To Improve kids eye vision, eye health, Foods For Better Eyesight
Heat Stroke : उष्माघातापासून कसा कराल बचाव? डॉक्टरांनी दिला सल्ला

4. बडीशेप

बडीशेप देखील दृष्टी सुधारण्यास मदत करते. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि ई आढळतात. जे डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात. यासाठी नियमितपणे बडीशेपचे पाणी प्या जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com