Kidney Disease Symptoms: ही ५ लक्षणे दिसताच व्हा सावध! असू शकते किडनी खराब, वेळीच घ्या काळजी

Kidney Disease Sign in Marathi: शरीराला निरोगी ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा अवयव असते ती किडनी. किडनी हे शरीरात महत्त्वाचे कार्य करते. शरीरात साचलेल्या घाणेरड्या पदार्थांना टाकून देण्याचे काम किडनी करते.
Kidney Disease Symptoms In Marathi
Kidney Disease Symptoms In MarathiSaam Tv

Kidney Disease Signs:

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा अवयव असते ती किडनी. किडनी हे शरीरात महत्त्वाचे कार्य करते. शरीरात साचलेल्या घाणेरड्या पदार्थांना टाकून देण्याचे काम किडनी करते. याची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते.

विविध कारणांमुळे किडनीच्या अनेक आजारांना (Disease) बळी पडावे लागते. ज्यामुळे गंभीर आजारांना बळी पडावे लागते. किडनीच्या (Kidney) संबंधित कोणत्याही समस्येचे निदान आणि शक्य तितक्या लवकर उपचार करणे गरजेचे आहे. जाणून घेऊया किडनीच्या आजारामुळे आपल्या शरीरात कोणती लक्षणे (Symptoms) दिसतात.

Kidney Disease Symptoms In Marathi
Family Planning Counselling : बाळासाठी प्रयत्न करताना जोडीदाराला हवा मानसिक आधार, तज्ज्ञांनी दिला सल्ला

1. थकवा

सतत थकवा जाणवणे हे किडनी निकामी होण्याचे लक्षण आहे. या परिस्थितीत रक्तामध्ये हळूहळू विषारी पदार्थ जमा होतात. ज्यामुळे व्यक्तीला खूप थकवा जाणवू लागतो.

2. झोपेची समस्या

झोपेची कमतरता जाणवत असेल तर काळजी घ्यायला हवी. हे किडनी खराब झाल्याचे लक्षण असू शकते. यासाठी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यामध्ये रक्त योग्यप्रकारे फिल्टर होत नाही. शरीरातील घाण शरीरातच राहते. त्यामुळे व्यक्तीला झोप येत नाही ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो.

3. त्वचा कोरडी पडणे

जेव्हा किडनीमध्ये खनिजे आणि इतर पोषक तत्वांची कमतरता जाणवते. तेव्हा रुग्णांची त्वचा कोरडी होऊ लागते. तसेच खाज येण्याची समस्या निर्माण होते.

Kidney Disease Symptoms In Marathi
Acne Skin Care : त्वचेवरील मुरुमांनी वैतागले आहात? सतत चेहऱ्याला खाज सुटते? स्किन केअर टीप्स फॉलो करा

4. वारंवार लघवी होणे

वारंवार लघवीला येणे हे देखील किडनी संबंधित समस्यांचे लक्षण आहे. तसेच लघवीमधून रक्त येणे हे देखील किडनी खराब होण्याचे लक्षण आहे. आपल्या शरीरातील रक्तापासून मूत्र वेगळे करण्याचे काम किडनी करते.

5. डोळ्यांखाली सूज येणे

डोळ्यांखाली सूज येत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. हे देखील किडनी निकामी होण्याचे लक्षण आहे. याला पफी आय सिंड्रोम म्हणतात. ज्यामध्ये किडनी शरीराताली प्रथिनांचा जास्त प्रमाणात पुरवठा मूत्रात करु लागते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com