Weight Loss In 10 Days : दहा दिवसांत वजन कमी करायचे आहे ? फक्त 'हे' काम करा, फरक जाणवेल

Weight Loss Tips : व्यायाम आणि डायट फॉलो न करता देखील तुम्ही वजन कमी करू शकता.
Weight Loss In 10 Days
Weight Loss In 10 DaysSaam Tv

Weight Loss In 10 Days : वाढत्या वजनाने त्रस्त असलेले लोक वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. काही लोक जिम जॉईन करतात, त्यांच्या आहारात बदल करतात, बाहेरील तेलकट पदार्थ खाणे बंद करून ग्रीन टी पिणे सुरु करतात.

पण तुम्हाला माहित आहे का व्यायाम आणि डायट फॉलो न करता देखील तुम्ही वजन कमी करू शकता. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स (Tips) सांगणार आहोत,ज्याचे पालन करून तुम्ही सहज वजन कमी करू शकाल. केवळ दहा दिवसातच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल.

Weight Loss In 10 Days
Weight Loss Tips : सेलिब्रिटी ट्रेनर सांगताहेत, वजन कमी करण्यासाठी फिटनेसचा फंडा !

1. खाण्याच्या सवयीमध्ये बदल करा

वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवय मध्ये बदल करणे गरजेचे आहे. पोषक तत्त्वांनी भरपूर आणि हेल्दी (Healthy) अन्नपदार्थाचा (Food) समावेश तुमच्या आहारात करा. बरेच लोक जास्ती वजन वाढत असल्याने कमी प्रमाणात खाण्याला महत्त्व देतात,परंतु असे न करता तुम्ही योग्य आहार घेऊन देखील वजन कमी करू शकता.

2 . लंच आणि डिनर दरम्यान हलके खाणे

रात्रीच्या जेवणात आणि दुपारच्या जेवणात जास्ती अंतर असल्याने यादरम्यान तुम्ही काहीतरी हलके स्नॅक्स खाऊन ओव्हरइटिंग पासून बचाव करू शकता. स्नॅक्स खाल्यामुळे तुम्हाला रात्रीच्या जेवणात जास्त भूक नसेल अशा वेळेस तुम्ही हलका आहार घेऊ शकता. ज्याने तुमचे वजन कमी करण्यास मदत होईल.

3. जेवण करताना लहान ताटाचा वापर करा

हा माईंड कंट्रोल फॉर्मुला तुमचे वजन कमी करण्यासाठी काम करेल. यासाठी तुम्हाला जेवताना लहान ताटाचा वापर करायचा आहे आणि पुन्हा पुन्हा जेवायला घेयायचे नाही. लहान ताटात जेवल्याने तुम्हाला असे वाटेन की खूप जेवण झाले. सुरवातीला तुम्हा भूक लागेल मग हळूहळू ही समस्या कमी होईल.

Weight Loss In 10 Days
Weight Loss Tips : दहा किलो वजन कमी होईल अवघ्या दोन आठड्यात, फक्त 'हा' डाएट प्लान फॉलो करा

4. जेवण्यापूर्वी गरम पेय घ्या

अनेक तज्ज्ञांच्या मते,जेवण्यापूर्वी गरम पेय घेतल्याने भूक कमी होते. त्यासाठी तुम्ही दररोज तुमच्या आवडीचे पेय जेवण्यापूर्वी घेऊ शकता किंवा गरम लिंबूपाणी आणि सूप यांचा समावेश तुमच्या आहारात करून वजन कमी करू शकाल.

5. रात्रीच्या जेवणानंतर २ तासांनी झोपा

रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपायला जाऊ नका. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर झोपण्याच्या २ तासापूर्वी जेवण करा. जर तुमची झोपण्याची वेळ १० वाजताची असेल तर तुमचे जेवण ८ वाजता झालेच पाहिजे.जेवणानंतर काहीही खाणे टाळा आणि नियमितपणे शतपावली सुरू करा. याने तुम्हाला काही दिवसातच फरक दिसू लागेल.

Weight Loss In 10 Days
Weight Gain Tips : खा खा खाल्ल तरी वजन काही वाढत नाही ? वजन वाढवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

6. हे देखील करा

वजन कमी करण्यासाठी हेल्दी आहार फार महत्वाचा असतो. दिवसभरातून ३ ते ४ लिटर पाणी प्यावे. बाहेरील अन्हेलदी अन्नपदार्थ खाणे बंद करा.या काही टिप्सचे पालन करून तुम्ही वजन कमी करू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com