
Fitness Tips : बऱ्याच लठ्ठ महिला त्यांच्या शरीरावरची चरबी कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेक महिला त्यांच्या लठ्ठ पायांमुळे आवडते शॉट घालू शकत नाही. आपल्या सगळ्यांनाच स्लिम अँड ड्रीम राहायला आवडते.
सोबतच तुमची बॉडी फिट राहील. त्यांनी एक्सरसाइज चा व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ (Video) सगळेजण पाहू शकतात.
जर तुम्ही सुद्धा संपूर्ण शरीराची चरबी घालवण्यासाठी एक चांगल्या प्रकारचा व्यायाम शोधत असाल तर, तुम्ही नम्रता पुरोहित यांच्या सगळ्या एक्सरसाइज केल्या पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया या एक्सरसाइज नेमक्या कोणत्या आहेत.
1. चेअर पोज :
ही एक्सरसाइज केल्याने संपूर्ण शरीराची चरबी वितळून जाते. सोबतच कफ सारख्या आजारांपासून सुटकारा मिळतो. सोबतच तुमच्या माकडहाडाची हड्डी फ्लेक्झिबल होण्यास मदत होते. एक्सरसाइज करण्यासाठी तुम्हाला एका चेअरवर बसायचे आहे. असं करून तुम्हाला तुमचे हात वरती उचलायचे आहेत. त्यानंतर तुमचे अॅब्स आतल्या दिशेने घेऊन डाव्या बाजूस वळून डावा पाय वरती उचला.
2. साईड लंज :
साईड लंज ही एक्झरसाइज स्थिरता आणि ताकद विकसित करते. ही एक्सरसाइज करण्यासाठी सरळ उभे राहून हात जोडून घ्या. असं करताना पायांना खांद्याच्या रुंदीमध्ये खोला. तुमची पाठण सरळ आणि वजन टाचण वरती असले पाहिजे. त्यानंतर डाव्या बाजूला एक स्टेप उचला. करताना तुमचे डोके सरळ ठेवा. आता तुमचा पाय 90 डिग्री पर्यंत मोडा. असं करताना तुम्ही तुमचा दुसरा पाय सरळ ठेवा. त्यानंतर हातांना आणि डाव्या पायाला तारे सारखे पसरवा.
3. ट्राइसेप्स :
एक्सरसाइज अप्पर बॉडी मजबूत करण्यासाठी केली जाते. सोबतच ही एक्सरसाइज केल्याने लवचिकता वाढते. ही एक्सरसाइज करण्यासाठी मॅटवरती हायप्लांक पोझिशन वरती या. अॅब्स टाईट करून गुडघ्यांना मोडा. त्यानंतर डावा पाय सोडून मागच्या बाजूला सरळ आडवा करा. सोबतच हाताखाली घेऊन डोकं खाली करा.
4. शोल्डर टॅप :
ही पोझिशन करताना मॅटवरती हाईप्लांक पोझिशन घ्या. त्यानंतर दडांना हात लावण्याचा प्रयत्न करा. ही एक्सरसाइज करताना तुमचे शरीर स्थिर ठेवा. तर उजव्या हाताला तोपर्यंत ढकला जोपर्यंत तो सरळ होत नाही. हाय प्लांक पोझिशन वरती येण्यासाठी डाव्या हाताने ही स्टेप फॉलो करा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.