Weight Loss Tips : दहा किलो वजन कमी होईल अवघ्या दोन आठड्यात, फक्त 'हा' डाएट प्लान फॉलो करा

Diet Plan : तुम्हाला हे माहित आहे का की तुम्ही विचार केला तर, दोन आठवड्यांमध्ये तुमचे दहा किलो वजन कमी होऊ शकते.
Weight Loss Tips
Weight Loss TipsSaam Tv

Diet Plan For Weight Loss : प्रत्येकजण दररोज चांगले दिसण्यासाठी काही ना काही करत असतो. अनेक स्त्रिया ऑफिसला जायच्यावेळी तीन ते चार वेळा कपडे बदलून बघतात की आपल्यावर नेमका कोणता कपडा चांगला दिसतोय. त्याचबरोबर फिट दिसण्यासाठी आपण काय करतो. परंतु ते संभव होत नाही.

बदलत्या हवामानामुळे आळस आणि चिडचिडेपणा वाढतो. त्याचबरोबर लहान मुलांच्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. या गोष्टींमुळे शरीरामध्ये चरबी जमा होते. चरबी जिथे जास्त दिसून येते, ती जागा म्हणजे दंड, पाठ, मान, चेहरा, पोट.

Weight Loss Tips
Weight Loss Tips: वजन कमी करायचं आहे? मग ही सात फळे ठरतील उपयुक्त

वजन पटापट वाढते परंतु ते कमी करण्यासाठी भरपूर कसरत करावी लागते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की तुम्ही विचार केला तर, दोन आठवड्यांमध्ये तुमचे दहा किलो वजन कमी होऊ शकते.

घरामध्ये राहून नियमित व्यायाम करून तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. असं करणं कोणासाठीही सोपे आहे. फक्त तुम्हाला योग्य आहाराच्या सेवणाची गरज आहे.

1. दिवसाची सुरुवात डिटॉक्स वॉटरने करा :

 • सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी (Water) पिऊन दिवसाची सुरुवात करा. असं केल्याने तुमच्या शरीर डीटॉक्स होते.

 • एका पातेल्यामध्ये दोन चमचे मेथी आणि पाणी टाकून पाच ते सात मिनिटे शिजवा.

 • पाणी अर्धे झाल्यानंतर गॅस बंद करा. त्यानंतर त्यामध्ये एक तुकडा अद्रकचा पिसून टाका.

 • त्याचबरोबर यामध्ये लिंबूचा रस मिसळवून सिप - सिप करून पाणी प्या.

फायदे (Benefits) :

 • अद्रक तुमच्या बॉडी मधील चरबी वितळवण्याचे काम करते. सोबतच लठ्ठपणाला कंट्रोल मध्ये ठेवण्याचे काम करते.

 • मेथीचे दाणे हे पोटासाठी अतिशय फायदेशीर असतात. मेथीमध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्यामुळे आणि कारक विषारी पदार्थ टाकण्यासाठी मदत होते.

 • लिंबू कॅलरीपासून कमी असतो आणि नियमित पाण्याच्या तुलनेमध्ये लिंबूचे पाणी हे तुम्हाला जास्त वेळ संतुष्ट ठेवते.

Weight Loss Tips
Weight Loss Food Combination : झटपट वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील 'हे' पाच अतरंगी फूड कॉम्बिनेशन !

2. फायबर आणि प्रोटीन युक्त नाष्टा :

 • जर तुम्ही ओट्समिल बनवत असाल तर दुधाबरोबर घ्या. सोबतच ओट्स मध्ये टॉपिंग जास्त प्रमाणात नका ठेऊ. सोबतच तुम्ही ओट्स सोबत भाज्या देखील खाऊ शकता.

 • तुम्ही मिक्स फ्रुट (Fruit) बाउल सोबत हळदीचे दूध पिऊ शकता. सोबतच मिक्स फ्रुट बाउल सोबत तुम्ही एक छोटा चमचा क्रीम घेऊ शकता.

 • जर तुम्ही नाश्त्याला पोहे खात असाल तर, तुमच्या थाळीमध्ये पन्नास ग्राम पनीर आणि सोबतच हळदीचे दूध प्या.

फायदे :

 • प्रोटीन आणि फायबर ने पूर्ण असलेले ओट्स तुम्हाला दीर्घकाळ संतुष्ट ठेवतात. ज्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही.

 • हे फायबर तुमच्या पचनसंस्थेसाठी चांगले असते. अशाटच अशा गोष्टी ज्यामध्ये प्रोटीनची मात्र जास्त असते. अशा गोष्टींचे सेवन केल्याने तुम्ही स्वतःला तंदुरुस्त फील करता.

Diet Plan
Diet Plan canva

3. तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये सलाड :

दुपारच्या जेवणामध्ये सलाड असेलच पाहिजे. रंगीबेरंगी भाज्यांसोबत (Vegetable) दुपारचे जेवण केल्याने तुमचे स्वास्थ्य चांगले राहते.

फायदे :

 • कच्च्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि मिनरल्स उपलब्ध असतात. त्यामुळे तुमचे आरोग्य सुदृढ राहते.

 • सलाड खाल्ल्याने तुमच्या मेटाबोलिजमवर परिमाण होतो. त्याचबरोबर वजन कमी होण्यास मदत होते.

Weight Loss Tips
Weight Gain Diet : कितीही खाल्लं तरी अंगाला लागत नाही, वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहात? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

4. ग्रीन टीचे सेवन :

 • दिवसामधून तीन वेळा ग्रीन टीचे सेवन केले पाहिजे. ग्रीन टीच्या सेवनाने पटापट वजन कमी होते.

 • त्याचबरोबर ग्रीन टीचे सेवन करून तुम्हाला एक तास चालायचे.

 • असे केल्याने तुमच्या शरीरामधील चरबी वितळण्यास मदत होते. तुमचे वजन पटापट कमी होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com