Fruits for Weight Loss : आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक व्यक्तींना स्थूलपणाच्या समस्येला सामोरे जावे लागते. सध्याची पिढी सतत संगणकावरील कामात व्यस्त असल्याने त्यांना व्यायाम करण्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही.
जास्त हालचाल नसल्याने शरीराची झीज होतं नाही. कॅलरी कमी न झाल्याने अनेकजण लठ्ठ होत चालले आहेत. अशात लठ्ठपणामुळे काही व्यक्ती डिप्रेशनमध्ये (Depression) देखील जातात. त्यामुळे यावर मात करणे गरजेचे आहे.
लठ्ठ झाल्यावर वजन वाढल्यावर अनेक जण जिम जॉईन करतात. जिममध्ये जाऊन कसरत करतात. अशात काही दिवस जिममध्ये गेल्यानंतर अनेक जण आर्ध्यातून जिमला जाणे बंद करतात. त्यामुळे वजन कमी (Weight Loss) करण्याचे मोठे आव्हान समोर उभे राहते.
मात्र तुम्हाला माहीत आहे का? वजन कमी करण्यासाठी फक्त कसरत करणे हाच एकमेव पर्याय नाही. तुम्ही तुमच्या आहारात योग्य तो बदल करून देखील शरीरावर वाढणारी अतिरिक्त चरबी कमी करू शकता.
आपण जे काही खातो त्यापासून आपल्याला ताकत मिळते. मात्र यातील अनेक पदार्थ असेही आहेत जे खाल्याने कोणतेही प्रोटीन मिळत नाही. किंवा याने तुमच्या कॅलरीज जास्त वाढतात. त्यामुळे असे पदार्थ खाण्यातून वगळल्यास तुम्हाला वजन कमी करण्यासाठी खूप फायदा होईल. तसेच भूक कमी लागावी आणि कमी खाता यावे यासह अशकातपणा जाणवू नये यसाठी देखील काही पदार्थ आणि फळे आहे. चला तर मग त्या फळांची अधिक माहिती घेऊ.
काकडी -
उन्हाळ्यात काकडी जास्त प्रमाणत खावी. या काळात काकडीचे सिजन असते. तसेच काकडीमध्ये जास्त पाणी असते. त्यामुळे शरीर थंड राहते शिवाय भूक कमी लागते आणि वजन कमी करण्यास मदत होते. यात तुम्हाला इलेक्ट्रॉन, खनिज आणि व्हिटॅमिन देखील मिळते. 100 ग्राम काकडीचे सेवन केल्यास तुम्हाला 16 कॅलरीज मिळू शकतात.
सलेडची पाने -
आपल्या आहारात सलेडची पाने असल्यास देखील खूप फायदा होतो. याने वजन वाढत नाही. तसेच वजन जास्त वाढले असेल तर ही पाने दिवसातून एकदा तरी खावीत. यात फॉलीक असिड, व्हिटॅमिन बी आणि लोह असते. त्यामुळे यामध्ये 100 ग्राम पानांचे सेवन केल्यावर 15 कॅलरी तयार होतात.
सफरचंद -
सफरचंद रोज एक तरी खावे असे अनेक डॉक्टर सांगतात. यात तुम्हाला 100 ग्रॅममध्येच 50 च्या आसपास कॅलरी मिळतात. सफरचंदमध्ये प्रेक्टिन देखील योग्य प्रमाणात असते. त्यामुळे दुपारच्यावेळी जास्त भूक लागलेली असताना जेवणात काही नसेल तर तुम्ही एक सफरचंद खाल्यावर देखील तुमचे पोट भरेल.
गाजर -
सध्या थंडीचे दिवस आहेत आणि बाजारात गाजर खूप स्वस्तात उपलब्ध आहे. त्यामुळे गाजराचे जास्त सेवन करावे. यात 100 ग्रॅम गाजर खाल्यावर 41 कॅलरीज मिळतात. गाजराचे सेवन केल्याने व्हिटॅमिन ए, सी मिळते. यात फायबर देखील असते. जेवणात डायेट करताना याचा खूप उपयोग होतो.
ब्रोकोली -
ब्रोकोली देखील खूप औषधी आहे. तुम्ही सलाडमध्ये ब्रोकोली खाऊ शकता. यात 100 ग्रॅमचे सेवन केल्यास 34 च्या आसपास कॅलरी मिळतात. अँटीऑक्सिडेंट आणि फायबर असतं. त्यामुळे ब्रोकोली एक सुपर फ्रूट म्हणून देखील ओळखले जाते.
टोमॅटो -
लाल बुंद टोमॅटो शरिदाठी खूप पौष्टिक आहे. यात प्रथिने असतात. 100 ग्राममध्ये यात तुम्हाला 19 कॅलरी मिळतात. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी देखील आहे. याने त्वचा देखील कोमल राहते. तुम्ही टोमॅटो ज्यूस देखील पिऊ शकता.
जुनिकी -
100 ग्रॅम जूनिकीचे सेवन केल्यास 18 कॅलरी मिळतात. यात फाइटोन्यूट्रिएंट्स असते. शरीरावर जाणवणारी खाज किंवा चेहऱ्यावर आलेल्या सरकुत्या याने कमी होतात. याने शरीरातील पाण्याचे प्रमाण देखील योग्य ठेवता येतं. तसेच वजन देखील याने कमी होण्यास मदत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.