
Weight Gaining Tips : वजन कमी करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात तसेच त्याबद्दल खूप लोक मार्गदर्शन सुद्धा करतात परंतु सड पातळ व्यक्तीने वजन कसे वाढवायचे याबद्दल कोणीच बोलत नाही.
सडपातळ व्यक्तींना आरोग्याच्या अनेक समस्या येत असतात अशक्तपणा आणि कमजोरी लगेच येते त्यामुळे त्यांचे फिट राहणे गरजेचे असते त्यामुळे लोक वजन वाढवण्यासाठी बाजारात (Market) उपलब्ध असलेल्या सप्लिमेंट घेतात त्या सप्लीमेंटचे बऱ्याच वेळा साईड इफेक्टस होतात आणि वजन देखील वाढत नाही.
खूप काही वेगवेगळे प्रयोग करून देखील वजन वाढण्यास अडथळे येत असतात.त्यामुळे आज निरोगी (Healthy) पद्धतीने वजन कसे वाढवता येईल त्याबद्दल न्यूट्रिशियन ममता प्रधान यांनी दिलेली माहिती जाणून घेऊ.
वजन वाढवण्यासाठी काय करावे?
तुम्ही जर वजन वाढवण्याचा प्रयत्न करत असाल तर चरबीच्या स्वरूपात न वाढवता स्नायूच्या स्वरूपात वाढणे गरजेचे आहे त्यामुळे आधी याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. स्नायू च्या स्वरूपात वजन वाढवण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते ते प्रथिने,कॅलरीज आणि स्नायूंचा ओव्हरलोड या तीन गोष्टी आहारातून मिळणे गरजेचे आहे.
वजन वाढवण्यासाठी आवश्यक प्रोटीन -
शरीराच्या वजनाच्या प्रति किलो किमान 1.5 ग्रॅम प्रोटीन मिळवले पाहिजे. तसेच कॅलरीज देखील मिळणे गरजेचे आहे त्यासाठी दररोज जळत असलेल्या कॅलरीज पेक्षा जास्ती 300 कॅलरीज मिळवण्याचा प्रयत्न करा. प्रोटीन आणि कॅलरीज योग्य प्रमाणात मिळवल्याने शरीर निरोगी राहते आणि वजन वाढण्यास मदत करते साठी तुम्हाला अन्नाच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते.
स्नायू ओव्हरलोड म्हणजे काय?
आमच्या मते स्नायू ओव्हरलोड द्वारे स्नायूंचा वस्तुमान वाढवण्यासाठी कार्य करणे होय. एखादा स्नायूला जेव्हा त्याच्या मर्यादेपर्यंत ढकलतो तेव्हा तो वाढतो आणि पुन्हा पुन्हा अधिक शक्तिशाली होतो त्याला आपण स्नायू हायपरट्रॉफी असे म्हणतो.
तुमची तीव्रता हळूहळू वाढवा. अधिक कार्डिओ करणे टाळा कारण हे तुम्हाला मिळणारे फायदा कमी करू शकते. निरोगी जीवनशैली फॉलो करा आणि भरपूर विश्रांती घ्या, रिलॅक्स राहा, सूर्यप्रकाश घ्या, धूम्रपान मध्यपान करणे बंद करा.
निरोगी वजन वाढवण्यासाठी काय खाणे गरजेचे आहे?
वजन वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रोटीन युक्त आहार तुमच्या शरीराला मिळाला पाहिजे त्यासाठी तुमच्या आहाराकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. जास्ती साखर, जलयुक्त कोण आणि औद्योगिक पदार्थ सहस सोयीस्कर पदार्थ चे सेवन टाळा.
उच्च कॅलरी मिळणारे पदार्थाचे सेवन केले पाहिजे तुमच्या आहारात दूध आणि केळीचा समावेश करा केळीमध्ये भरपूर कॅलरीज असतात. दररोज दोन अंडी उकडून खाल्ल्याने तुमचे वजन वाढते अंड्यामध्ये असणारे मुबलक प्रोटीन वजन वाढवण्यास मदत करते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.