Diabetes Health : कामाच्या ठिकाणी मधुमेहाची पातळी वाढण्याची भीती वाटते? अशाप्रकारे घ्या काळजी

How workaholic Person can avoid diabetes : बरेचदा आपल्याला कामाचा अति ताण आला की, रक्तातील साखरेची पातळी वाढते.
Diabetic
Diabetic Saam Tv
Published On

Diabetes and Stress : भारतातील १०० टक्केपैकी ९० टक्के लोक मधुमेहाच्या आजाराने त्रस्त आहेत. बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, चिंता यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. सध्याच्या काळात वेगाने पसरणारी आरोग्याची समस्या ही मधुमेह आहे.

बरेचदा आपल्याला कामाचा अति ताण आला की, रक्तातील साखरेची पातळी वाढते. अशावेळी नेमके काय करावे हा प्रश्न अनेकांना पडतो. जर काही गोष्टींची काळजी घेतली तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर काय करायला हवे हे जाणून घेऊया.

Diabetic
Bad Cholesterol : नसात जमलेल्या घाणेरड्या कोलेस्ट्रॉलला मुळापासून उपटून टाकेल स्वयंपाकघरातील पदार्थ, Heart Attack पासून करेल बचाव

मुंबईच्या फोर्टीस हॉस्पिटलमधील एंडोक्रिनोलॉजीस्ट डॉ. श्वेता बुदियाल म्हणाल्या, भारतामध्ये आता १०१ दशलक्षहून अधिक लोक मधुमेहासह जगत आहेत. २०१९ सालच्या संख्येहून हा आकडा ७७ दशलक्षहून अधिक आहे. मधुमेह हा जीवनशैलीशी निगडित एक दीर्घकालीन आजार आहे व भविष्यात त्यातून इतर आरोग्यसमस्यांचा धोका निर्माण होण्याची शक्यता कमी करण्यासाठी त्याचे नीट व्यवस्थापन करणे गरजेचे असते.

नोकरदार व्यक्तींसाठी, विशेषत: बैठे काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हे आव्हानात्मक ठरू शकते. मधुमेह असलेल्या व्यक्ती काही वेळा आपल्या जीवनशैलीत सतत बदल करत नाहीत किंवा सांगितलेली औषधे घेत नाहीत. मधुमेह (Diabetes) असलेल्या व्यक्तींनी मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणे गरजेचे आहेच तसेत त्याचे वेळापत्रक देखील ठरवणे गरजेचे आहे.

Diabetic
Cholesterol Control Foods: मुळापासून नष्ट होईल कोलेस्ट्रॉल; हार्ट अटॅकचा धोका कमी, हे पदार्थ रोज खा

भारतामध्ये (India) अबॉटच्या मेडिकल अफेअर्स विभागाच्या संचालक अश्विनी पवार म्हणाल्या, मधुमेह असलेल्या व्यक्तींचे आरोग्य जपण्यासाठी आजाराचे (Disease) व्यवस्थापन महत्त्वाचे असते. मात्र अनेक जण लिहून दिलेली औषधे घेत नाहीत. अबॉटमध्ये आम्ही केवळ उपचारांच्या पलीकडे जात लोकांना चांगल्या सवयी लावून घेण्यास मदत करतो आणि वेळच्यावेळी औषधे घेण्यामध्ये येणाऱ्या नेहमीच्या अडचणी दूर करतो. गोळी गिळण्यास सोपे जावे यासाठी खास आवरण असेल्या गोळ्या तयार करण्यासारख्या रुग्ण-केंद्री नवीन संकल्पना राबविल्यास रुग्णांना या अडचणींवर मात करण्यास मदत होईल. अशा उपाययोजनांच्या माध्यमातून रुग्ण आपल्या मधुमेहाचे परिणामकारकरित्या व्यवस्थापन करू शकतील असे आमचे मत आहे.

आपला मधुमेह नियंत्रणात ठेवण्याचे ७ मार्ग पुढीलप्रमाणे:

1.मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी आपल्या कामाच्या स्वरूपाशी मेळ साधू शकेल अशी कृतीयोजना आखा:

मधुमेह व नोकरी या दोन्हीं गोष्टीची काळजी घेण्यासाठी व त्यातून मार्ग काढण्यासाठीरात्री व्यवस्थित झोप घेतल्याने खूप फरक पडतो. तसाच दिवसाची सुरुवात कशाप्रकारे करतो यावर अवलंबून असते. तुम्ही तुमच्या दिवसाचे नियोजन कसे करता यानेही पडतो. आपले नियमित वेळापत्रक तयार करा. ब्रेकफास्ट करायला विसरु नका. साखरेच्या पातळीमधील चढ-उतार दूर ठेवण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. बिनकामाच्या कॅलरीजवर मर्यादा ठेवा आणि मीठ व सॅच्युरेटेड फॅट्समध्ये कपात करा.

Diabetic
Most Dangerous Fort In Maharashtra: डोळ्यांना स्वर्ग सुख देणारा महाराष्ट्रातील खतरनाक किल्ला, संध्याकाळ होण्यापूर्वीच परतावे लागते

2.मधल्या वेळी खाण्याचे पदार्थ नीट

ऑफिसात कधी तुमचे सहकारी चिप्स किंवा तळलेल्या पदार्थांवर किंवा गोळ्या-चॉकलेटांवर भलेही ताव मारत असतात किंवा मिठाई खात असाल. हे पदार्थ पूर्णपणे टाळणे खरोखरीच कठीण असू शकते, तेव्हा ते प्रमाणात खा आणि आपण काय खात आहोत हे देखील लक्षात ठेवा. जर काही मधल्यावेळी भूक लागत असेल तर फळे, सुकामेवा, दही यांसारखे आरोग्यपूर्ण स्नॅक्स खा. तसेच तहान लागल्यावर साखरयुक्त किंवा कॅफीनयुक्त पेये पिण्याऐवजी पाण्याने तहान भागवणे योग्य हे लक्षात ठेवा.

3.सकस आहार महत्त्वाचा:

तुम्हाला एक सकस, संतुलि‍त मील घेता येईल आणि तुम्हाला बाहेरच्या खाण्यावर अवलंबून रहावे लागणार नाही. मधुमेह-स्नेही आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, स्टार्च नसलेल्या भाज्या, आरोग्यदायी कर्बोदके, प्रथिने आणि कर्बोदकांचे प्रमाण कमी असलेली फळे यांचा समावेश होऊ शकतो. , खास प्रसंगी, जसे की सहकाऱ्याचा वाढदिवस किंवा टीम लंच वगैरे असताना आपण किती कॅलरीजचे सेवन करायचे हे आधीच ठरवा.

Diabetic
Famous Place In Vidarbha : स्वर्गाहूनही सुंदर विदर्भातली ही ठिकाणं, निसर्गाचं सौंदर्य पाहून भुरळ पडेलच!

संतुलित आहारासोबतच जेवणाआधी आणि जेवणानंतर आपली ग्लुकोजची पातळी तपासणेही महत्त्वाचे आहे. कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग (CGM) उपकरणे तुमची दिवसभरातली ग्लुकोजची पातळी तपासत राहण्यासाठी मदत करू शकतात, व तुम्हाला त्या-त्या वेळची आकडेवारी देत मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यास मदत करणारे साधन बनू शकतात.

4.आपल्या औषधांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळा:

मधुमेह व्यवस्थित सांभाळण्यासाठी औषधे वेळच्यावेळी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्यामुळे तुमचे ग्लायकेमिक नियंत्रण चांगले राहते. यातील कोणतेही औषध कामावर जाऊन घ्यायचे असेल तर त्यासाठी आपल्या फोनवर रिमाइंडर लावा किंवा आपल्या डेस्कवर वेळ सांगणारी सूचना लिहून ठेवा.

Diabetic
Famous Hill Stations in Konkan : डोळ्यांचे पारणं फेडणारं अन् निसर्गाच्या कुशीत वसेललं कोकणातील घाट

5. तुमच्या टीमला तुमच्या आजाराची माहिती असू द्या:

तुम्हाला चालणार असेल तर आपल्या मॅनेजर आणि टीमशी मधुमेहाबरोबर जगण्याविषयी बोला. यामुळे त्यांना तुम्ही आजारांच्या तडजोडींची विनंती करू शकता किंवा लंचच्या वेळेत सातत्य ठेवण्यास त्यांना सांगू शकता. साखरेचे प्रमाण अचानक वाढण्या-कमी होण्यामुळे निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती उद्भवलीच तर कोणती महत्त्वाची पावले उचलायची याबद्दलही त्यांच्याशी चर्चा करा, म्हणजे अशा परिस्थितीत तुमची मदत कशी करायची हे त्यांना माहीत होईल.

6.चालणे सुरु ठेवा:

बऱ्याचशा कार्यालयांमध्ये बैठी जीवनपद्धती आढळून येते. शारीरिक हालचालींमुळे मधुमेहग्रस्त व्यक्तींच्या स्थितीमध्ये सुधारणा होण्यास मदत होते. आपल्या डेस्कवरच थोडे स्ट्रेचिंग करून सक्रिय बना, ऑफिसमध्ये किंवा बाहेरही थोडे चाला, पायऱ्या चढा आणि उतरा. अलीकडेच केलेल्या एका पाहणीच्या निष्कर्षांनुसार जेवल्यानंतर चालल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होत. त्यानंतर या व्यायामांना कामावर येण्याआधीच्या किंवा कामानंतरच्या वेळापत्रकामध्ये जागा द्या.

Diabetic
Diabetes Health In Monsoon: मधुमेहाला सांभाळत असा घ्या पावसाचा आनंद; आरोग्याची काळजी घेताना या सूचनाचे पालन कराच!

7.ताणतणावांचे व्यवस्थापन करायला शिका:

तुम्ही तणावाखाली असता तेव्हा तुमच्या ग्लुकोजच्या पातळीमध्ये बदल झाल्याचे तुमच्या लक्षात येईल. काही वेळा तुम्ही कामामध्ये अक्षरश: बुडून जाता. अशा कठीण प्रसंगी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची तर ताणतणावांशी जुळवून घेण्याची यंत्रणा उपयुक्त ठरेल. एखाद्या शांत कोपऱ्यात ध्यानधारणा करा, मन मोकळे करण्यासाठी वेळ शोधा आणि ताण निर्माण होण्याची कारणे ओळखा व त्यांचे व्यवस्थापन करा. आपल्याला साजेसे मधुमेह-स्नेही वेळापत्रक तयार करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही कामाच्या ठिकाणीही तुमच्या मधुमेहाचे अधिक चांगले व्यवस्थापन करू शकाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com