Refrigerator placement: फ्रिज खिडकीजवळ ठेवावा की भिंतीजवळ? तुमच्या घरी कुठे आहे, वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा

Fridge direction as per Vastu: घरात फ्रिज कोणत्या दिशेला ठेवावा, भिंतीपासून किती अंतर ठेवावे आणि खिडकीजवळ फ्रिज ठेवणे का टाळावे? वास्तुशास्त्रानुसार फ्रिज ठेवण्याची योग्य जागा, गॅस शेगडीपासूनचे अंतर आणि स्वच्छतेशी संबंधित महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.
Refrigerator placement
Refrigerator placementsaam tv
Published On: 

घरात फ्रिज कुठे ठेवावा, हा प्रश्न अनेकांना पडतो. स्वयंपाकघरात जागा कमी असल्याने फ्रिज कधी खिडकीजवळ तर कधी भिंतीला लागून ठेवला जातो. मात्र वास्तुशास्त्रानुसार, फ्रिज ठेवताना त्याची दिशा आणि आजूबाजूची जागा याकडे लक्ष देणं महत्त्वाचं मानलं जातं. फ्रिज भिंतीजवळ ठेवायला हरकत नाही, पण तो भिंतीला अगदी चिकटवून ठेवू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.

फ्रिज भिंतीजवळ ठेवताना काय काळजी घ्यावी?

वास्तुशास्त्रानुसार, फ्रिज भिंतीजवळ ठेवला पाहिजे. पण फ्रिज आणि भिंत यांच्यामध्ये काही इंच अंतर ठेवणं गरजेचं आहे. फ्रिजच्या आजूबाजूला हवा खेळती राहण्यासाठी ही जागा उपयोगी ठरतं. फ्रिज एकदम भिंतीला चिकटवून ठेवल्यास त्याच्या कामावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे फ्रिज ठेवताना थोडी मोकळी जागा सोडावी.

Refrigerator placement
Kitchen Vastu Tips: किचनमध्ये फ्रीज आणि झाडू कुठे ठेवताय? योग्य दिशा माहितीये का? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

फ्रिज ठेवण्यासाठी दक्षिण-पश्चिम, पश्चिम किंवा दक्षिण दिशा शुभ मानली जाते. तर घरातील उत्तर-पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेला फ्रिज ठेवणं टाळावं, असं वास्तुशास्त्रात सांगितलंय. फ्रिजचा दरवाजा पूर्व दिशेला उघडत असेल, तर ते चांगलं मानलं जातं.

Refrigerator placement
Vastu Tips: फ्रीज किचनमध्ये ठेवणं शुभ की अशुभ? नेमका कुठे ठेवावा? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

खिडकीजवळ फ्रिज ठेवणं का टाळावं?

फ्रिज खिडकीजवळ ठेवण्यापेक्षा भिंतीजवळ ठेवणं योग्य मानलं जातं. खिडकीजवळ फ्रिज ठेवल्यास त्यावर थेट सूर्यप्रकाश पडण्याची शक्यता असते. उन्हामुळे फ्रिज गरम होऊ शकतो. याचा परिणाम फ्रिजच्या थंड करण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो. त्यामुळे फ्रिज ठेवताना थेट सूर्यप्रकाश पडणार नाही, याची काळजी घ्यावी.

गॅस शेगटीपासूनही ठेवा अंतर

फ्रिज ठेवताना गॅस शेगडीचाही विचार करणं आवश्यक आहे. फ्रिज आणि गॅस शेगडी एकदम जवळ ठेवू नयेत. दोघांमध्ये किमान एक फुटाचं अंतर ठेवणं योग्य मानलं जा

Refrigerator placement
Vastu Tips for Fridge: फ्रीजमध्ये उष्टं आणि शिळं अन्न ठेवणं योग्य? वाचा वास्तुशास्त्रात काय नियम सांगण्यात आलेत

तसंच फ्रिजची नियमित स्वच्छता करावी. त्यामध्ये खराब झालेले किंवा बरेच दिवस पडून असलेले अन्नपदार्थ ठेवू नयेत. फ्रिज स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवल्याने घरातील स्वच्छतेकडेही लक्ष दिले जाते. त्यामुळे फ्रिज ठेवताना दिशा, भिंतीपासूनचे अंतर, खिडकीतील सूर्यप्रकाश आणि गॅस शेगडीपासूनची जागा या गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.