Child swallowed magnet: धक्कादायक घटना! खेळता खेळता सात वर्षांच्या मुलीने गिळला चुंबक, डॉक्टरांच्या तत्परतेने वाचला जीव

Magnet ingestion case: ठाण्यात सात वर्षांच्या मुलीने चुंबक गिळल्यानंतर तातडीने एंडोस्कोपी करून डॉक्टरांनी तिचा जीव वाचवला. वेळेत उपचार मिळाल्यामुळे गंभीर गुंतागुंत टळली. ही घटना पालकांसाठी महत्त्वाचा सुरक्षिततेचा इशारा ठरते.
Child swallowed magnet
Child swallowed magnetSAAM TV
Published On

कधी कधी घरात घडणारी अगदी साधीशी घटना क्षणात गंभीर स्वरूप धारण करू शकते, याचा प्रत्यय ठाण्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेतून आला आहे. खेळता खेळता सात वर्षांच्या एका लहान मुलीने चुकून चुंबक गिळलं आणि कुटुंबियांची एकच धावपळ उढाली. मात्र वेळेवर दाखवलेली सतर्कता आणि डॉक्टरांच्या तत्परतेमुळे धोकादायक परिस्थिती अखेर सुरक्षितपणे हाताळण्यात आली.

घरात खेळता खेळता सात वर्षांच्या एका मुलीने चुकून सुमारे ३ सेंटीमीटर लांबीचा चुंबक गिळला. ही घटना घडल्यानंतर सुरुवातीला मुलगी अगदी सामान्य होती आणि तिला कोणताही त्रास जाणवत नव्हता. मात्र, तिचे आजोबा डॉक्टर असल्याने त्यांनी या घटनेतील धोका लगेच ओळखला आणि वेळ न घालवता तिला ठाण्यातील किम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

Child swallowed magnet
Stomach cancer symptoms: शरीरात हे 4 बदल दिसले तर समजा पोटाचा कॅन्सर झालाय, लक्षणं ओळखणं फारच कठीण

या प्रकरणात आणखी एक अडचण होती. मुलीने चुंबक गिळण्याच्या सुमारे एक तास आधीच जेवण केलं होते. त्यामुळे तातडीने भूल देऊन प्रक्रिया करणं जोखमीचे ठरू शकत होतं. कारण अशा वेळी पोटातील अन्न श्वसनमार्गात जाऊन फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते आणि त्यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

ही परिस्थिती लक्षात घेऊन गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागातील तज्ज्ञांनी तातडीने एंडोस्कोपी करून चुंबक बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. एंडोस्कोपीदरम्यान चुंबक पोटात न पचलेल्या अन्नाच्या अवशेषांमध्ये अडकलेला दिसून आलं. त्यामुळे ते शोधणं आणि सुरक्षितपणे बाहेर काढणं अधिक कठीण झालं.

तरीही बालरुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या विशेष एंडोस्कोप आणि आधुनिक उपकरणांच्या मदतीने डॉक्टरांनी चुंबकाचा अचूक शोध घेतला आणि कोणतीही इजा न होऊ देता तो यशस्वीरित्या बाहेर काढला. प्रक्रियेनंतर करण्यात आलेल्या तपासणीत मुलीच्या पोटाला किंवा जठरांत्र मार्गाला कोणताही गंभीर त्रास किंवा इजा झालेली नसल्याचं स्पष्ट झालं.

या प्रकरणाबाबत बोलताना उपचार करणारे डॉ. मनीष दोडमणी यांनी सांगितलं की, “मुलाने किंवा मुलीने चुंबक गिळणं ही घटना नेहमीच आपत्कालीन मानली पाहिजे. जरी मूल बाहेरून पूर्णपणे ठीक दिसत असलं तरी. उपचारात उशीर झाल्यास आतड्यांना गंभीर इजा, छिद्र पडणे यांसारख्या धोकादायक गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. वेळेत उपचार मिळाल्यास मोठी शस्त्रक्रिया टाळता येते आणि रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.”

प्रक्रियेनंतर काही तासांतच मुलीची प्रकृती स्थिर झाली आणि तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

ही घटना पालकांसाठी एक महत्त्वाचा इशारा ठरते. घरातील खेळणी, स्टेशनरी किंवा इतर वस्तूंमध्ये असलेले छोटे चुंबक मुलांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे मुलाने चुंबक गिळल्याचा संशय जरी आला, तरी कोणतीही लक्षणं नसली तरी तात्काळ वैद्यकीय मदत घेणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय.

Child swallowed magnet
Uterine infection: गर्भाशयात इन्फेक्शन झाल्यावर कोणती लक्षणं दिसतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला कधी घ्याल

सुदैवाने या प्रकरणात वेळेत धोका ओळखला गेला आणि डॉक्टरांनी जलद उपचार केल्यामुळे मुलीचा जीव वाचला आणि ती पूर्णपणे सुरक्षितपणे घरी परतू शकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com