Uterine infection: गर्भाशयात इन्फेक्शन झाल्यावर कोणती लक्षणं दिसतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला कधी घ्याल

Pelvic inflammatory disease: गर्भाशयाचा संसर्ग (एंडोमेट्रायटिस) महिलांमध्ये सामान्य पण गंभीर समस्या ठरू शकतो. पोटदुखी, असामान्य स्राव आणि वेदना ही प्रमुख लक्षणे आहेत. वेळेत निदान आणि उपचार घेतल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते.
Uterine infection
Uterine infectionSAAM TV
Published On

महिलांच्या शरीरात वेळोवेळी अनेक बदल होत असतात. काही बदल हे पूर्णपणे सामान्य असतात पण काही बदल हे आतून सुरू असलेल्या आजाराचे संकेत देऊ शकतात. त्यापैकीच एक महत्त्वाची समस्या म्हणजे गर्भाशयाचा संसर्ग. अनेकदा हा त्रास सुरुवातीला साध्या पोटदुखीसारखा, पांढऱ्या स्रावासारखा किंवा संबंधाच्या वेळी होणाऱ्या वेदनेसारखा वाटतो आणि त्यामुळे दुर्लक्षित केला जातो. पण हा संसर्ग वेळीच ओळखणं खूप गरजेचं असतं.

गर्भाशयाचा संसर्ग म्हणजे काय?

डॉक्टरांच्या मते गर्भाशयातील संसर्गाला वैद्यकीय भाषेत एंडोमेट्रायटिस असं म्हणतात. हा संसर्ग गर्भाशयाच्या आतील थरात म्हणजेच एंडोमेट्रियममध्ये होतो. काही वेळा हा त्रास पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज (PID) चा भाग म्हणूनही दिसून येतो.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, जर हा संसर्ग सुरुवातीच्या टप्प्यात ओळखला गेला तर तो गंभीर होण्यापासून टाळता येतो आणि उपचारही सोपे होतात. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करणं खूप महत्त्वाचं आहे.

गर्भाशयात संसर्ग का होतो?

हा संसर्ग एका कारणामुळे नाही तर अनेक कारणांमुळे होऊ शकतो. त्यामध्ये लैंगिक संबंधातून पसरणारे संसर्ग जसं की, क्लॅमिडिया आणि गोनोरिया हे प्रमुख कारण मानले जातात. काही महिलांमध्ये प्रसूतीनंतर योग्य काळजी न घेतल्यामुळेही संसर्ग होऊ शकतो. त्याचप्रमाणे कॉपर टी किंवा इतर गर्भनिरोधक साधनांचा वापर करताना काही वेळा संसर्गाची शक्यता वाढते. याशिवाय योनीमध्ये असलेल्या नैसर्गिक बॅक्टेरियांचा समतोल बिघडला तरीही हा त्रास होऊ शकतो.

Uterine infection
Heart Attack: हार्ट अटॅक येणारे हे लवकर कसं ओळखाल? 5 लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच

गर्भाशयात संसर्गाची लक्षणं कोणती?

या आजारात सर्वात सामान्य लक्षण म्हणजे पोटाच्या खालच्या भागात किंवा पेल्विक एरियामध्ये होणारी सतत किंवा अधूनमधून वाढणारी वेदना. काही महिलांना ही वेदना सतत जाणवते, तर काहींना वेळोवेळी ती वाढताना दिसते.

दुसरे महत्त्वाचे लक्षण म्हणजे योनीतून होणारा असामान्य स्राव. हा स्राव पांढरा, पिवळा किंवा हिरव्या रंगाचा असू शकतो. डॉक्टरांच्या मते सामान्यतः फक्त पांढरा स्राव असतो, पण रंग बदललेला किंवा जास्त प्रमाणात स्राव होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. काही महिलांमध्ये पीरियड्सच्या मधोमध हलका रक्तस्राव किंवा अनियमित ब्लीडिंगही दिसू शकते. हेही संसर्गाचे एक संकेत असू शकते.

Uterine infection
Fatty Liver Disease: देशातील 38% लोक फॅटी लिव्हरच्या समस्येने ग्रस्त, शरीरात दिसणारी ही 5 लक्षणं ओळखा

याशिवाय लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणं हे लक्षणही काही वेळा दिसतं. मात्र हे यूटीआय (UTI) मध्येही होऊ शकते, त्यामुळे दोन्ही आजारांमधील फरक ओळखणं महत्त्वाचं आहे. तसंच संबंधाच्या वेळी वेदना, अस्वस्थता किंवा त्रास जाणवणं हेही गर्भाशयातील संसर्गाचं महत्त्वाचं लक्षण आहे आणि याकडे दुर्लक्ष करू नये.

डॉक्टराचा सल्ला केव्हा घ्यावा?

जर एखाद्या महिलेला पीरियड्स व्यतिरिक्त स्पॉटिंग, हलका रक्तस्राव, योनीतून दुर्गंधी येणारा असामान्य स्राव किंवा संबंधानंतर वाढणारी पोटदुखी ही लक्षणं सतत दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ जाणवत असतील, तर हे गंभीर संकेत असू शकतात. अशा वेळी वेळ न घालवता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे असते.

Uterine infection
Health checkups after 40: वयाच्या 40 नंतर शरीरात सुरू होतात हे बदल, डॉक्टरांनी सांगितल्या या 4 टेस्ट करून घ्याच!

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com