

आपण दररोज ऑफिसला जातो आणि काम करतो. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की, बिझी शेड्युलमुळे तुमची हालचाल कमी होत चाललीये. या बैठ्या जीवनशैलीचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय. दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम करण्याची सवय वाढल्यामुळे विविध आजार होण्याचा धोका असतो. असाच एक वाढलेला धोका म्हणजे कोलेस्ट्रॉल.
तज्ज्ञांच्या मते, ३० वर्षांनंतर तरुणांमध्ये लिव्हरशी संबंधित त्रास आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याचं प्रमाण झपाट्याने वाढतंय. साधारणपणे यासाठी डॉक्टर औषधे देतात जी रक्त पातळ ठेवण्यास मदत करतात. आयुर्वेदातही या समस्येवर नैसर्गिक उपाय सांगितले आहेत, जे कमी औषधांमध्येही आरोग्य सुधारण्यासाठी उपयोगी ठरू शकतात.
शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. यामुळे स्ट्रोक आणि हार्ट येण्याची शक्यता जास्त होते. विशेष म्हणजे सुरुवातीला याची लक्षणं फारशी जाणवत नाहीत. पण काही संकेत दिसू शकतात. यामध्ये डोळ्यांच्या पापण्यांवर पिवळसर डाग, छातीत वेदना, श्वास घेताना त्रास, सतत थकवा जाणवणं आणि पायात गोळे येणं. आयुर्वेदानुसार, सुरुवातीच्या टप्प्यात काही साधे उपाय केल्यास खराब कोलेस्ट्रॉल कमी करता येते.
दिवसाची सुरुवात मेथीच्या पाण्याने केल्यास फायदा होऊ शकतो. रात्री मेथीचे दाणे पाण्यात भिजत ठेवावेत आणि त्यात एक लसूण पाकळी टाकावी. सकाळी हे पाणी गाळून प्यायल्यास रक्तातील साचलेला कोलेस्ट्रॉल हळूहळू कमी होण्यास मदत होते.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात ओट्सचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. ओट्समधील बीटा-ग्लूकन आणि अलसीतील ओमेगा-३ हे घटक हृदयासाठी चांगले मानले जातात. यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. याशिवाय आहारात राजमा आणि विविध डाळींचा समावेश करावा.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, आहारातून रिफाइंड तेल पूर्णपणे काढून टाका. कारण हे कोलेस्ट्रॉल वाढण्यामागील एक मोठं कारण मानलं जातं. एकंदरीत, बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयी यामुळे वाढणाऱ्या कोलेस्ट्रॉलच्या समस्येकडे वेळेवर लक्ष देणं गरजेचं आहे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.