Naneghat Reverse Waterfall : पावसाळा म्हटलं की, पर्यटकप्रेमींना डोहाळे लागते ते निसर्गरम्य परिसर फिरण्याचे. पावसाळ्यात अनेकदा आपण आपल्या फॅमिली किंवा मित्र-मैत्रिणीसोबत फिरण्याचा प्लान करतो. कोसळणारा पाऊस आणि त्यात सर्वत्र दिसणारे हिरवागार परिसराचा आनंद कोणाला नको.
पाऊस सुरु होण्यापूर्वीच आपण यंदा कुठे कुठे फिरायला जायचे याचा प्लान करतो. अनेकदा ट्रेकिंग करताना आपण डोंगराळ भागातून फिरायला जातो. पण तुम्ही कधी उलटा धबधबा पाहिला आहे का ? महाराष्ट्रामध्ये असे अनेक धबधबे आहेत पण तुम्ही रिव्हर्स वॉटरफॉल कधी भेटली दिली आहे का ?
महाराष्ट्रात (Maharashtra) असा एक धबधबा आहे जिथून पाणी खाली जात नाही तर पर्वतांवरुन जाते. हा धबधबा (Waterfall) कुठे आहे ? येथे कसे जायचे ? याविषयी जाणून घेऊया सविस्तर
1. महाराष्ट्रात कुठे आहे उलटा धबधबा ?
हा उलटा धबधबा महाराष्ट्र राज्यात कोकण किनारपट्टी आणि जुन्नर नगरमध्ये वसला आहे. पुण्यापासून (Pune) याचे अंतर सुमारे 150 किमी आहे. तर मुंबईपासून याचे अंतर सुमारे १२० किमी आहे. याला अनेक नावांनीही ओळखले जाते. काही लोक याला नाणेघाट म्हणतात, तर काही लोक नाना घाट म्हणून ओळखतात. नानेघाट गुहेत ब्राह्मी आणि संस्कृतमधील शिलालेख असल्याने सातवाहन राजघराण्याने या शहराची स्थापना केली असे मानले जाते.
2. हा धबधबा उलटा का वाहतो ?
एखादी गोष्ट उंचावरून फेकली की ती गुरुत्वाकर्षणामुळे खाली जमिनीवर पडल्याचे दिसून येते. तसेच धबधबे देखील गुरुत्वाकर्षणाचे पालन करतात, परंतु नाणेघाट धबधबा या नियमांमध्ये येत नाही. हा त्याच्या विरुद्ध दिशेने वाहातो. घाटाच्या उंचीवरून धबधबा वाहण्याऐवजी तो उलटा वर येतो. नाणेघाटमध्ये पाणी खाली पडण्याऐवजी वर जाते. याबाबत विज्ञान सांगते की, नाणेघाटात वारे खूप वेगाने वाहतात. त्यामुळे धबधबा खाली पडला की वाऱ्यामुळे पाणी वर जाऊ लागते.
3. या ठिकाणी कोणत्या गोष्टी करता येतील ?
ट्रेकर्समध्ये नाणेघाट खूप लोकप्रिय आहे. म्हणून, पहिल्यांदाच ट्रेकिंगला जाणार असाल तर या ठिकाणाला भेट द्या. नाणेघाटला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ म्हणजे पावसाळा. नाणेघाट ट्रेक हा घाटघरच्या जंगलाचा एक भाग आहे, जो मुंबईपासून 120 किमी आणि पुण्यापासून सुमारे 150 किमी अंतरावर आहे. ट्रेक स्वतः 4 ते 5 किमी लांबीचा आहे. हे अंतर साधारणत: 5 तासांत पूर्ण केले जाऊ शकते.
4. नाणेघाट या धबधब्याला कसे भेट द्याल ?
कल्याण बसस्थानकावरून जुन्नरला जाण्यासाठी राज्य परिवहनची बस मिळते. मुक्कामाचे ठिकाण माळशेज घाट रोडवर वैशाखरे गावाजवळ आहे. यापुढे नाणेघाटला रस्त्याने सहज जाता येते. तसेच, मुंबई आणि पुण्यात अनेक ट्रेकिंग ग्रुप आहेत जे या ठिकाणी घेऊन जातात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.