ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भिवपुरी धबधबा - कर्जत जवळील भिवपुरी गावात हा धबधबा असून पावसाळ्यात हा परिसर संपूर्णपणे निसर्गाच्या रंगात रंगलेला असतो.
तुंगारेश्वर धबधबा - वसईत हिरव्या पहाडांनी नटलेल्या तुंगारेश्वर हा धबधबा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी ट्रेकर्स मंडळी पावसाळ्याची वाट पाहत असतात.
पांडवकडा धबधबा - शहराच्या धकाधकीच्या जीवनात शहरातीलच एक अतिशय निसर्गरम्य धबधबा नवी मुंबईकरांसाठी निसर्गाची देण आहे. खारघर जवळ पांडवकडा धबधबा असून अनेक पर्यटक याठिकाणी भेट देत असतात.
वांगणी धबधबा - वांगणीजवळ असलेल्या या धबधब्याला भगीरथ धबधबा असं देखील म्हणतात. पर्यटकांची विशेष गर्दी याठिकाणी होते.
ठोसेघर धबधबा - साताऱ्यापासून २० किमी अंतरावर असलेला तब्बल ५०० मीटर उंच असा हा धबधबा आहे. निसर्गाच्या कुशीत लपलेलं हे सुंदर ठिकाण आहे.
लिंगमळा धबधबा - महाबळेश्वरपासून फक्त ६ किमी अंतरावर असलेला हा धबधबा पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतो. ऑगस्ट ते डिसेंबर पर्यंत पर्यटकांची गर्दी याठिकाणी पाहायला मिळते.
दुगरवाडी धबधबा - चोही बाजूने झाडीने नटलेल्या दुगरवाडीमध्ये हा धबधबा असून हे ठिकाण नाशिकपासून ३० किमी अंतरावर आहे.
रंधा धबधबा - भंडारदरापासून १२ किमी लांब असलेला हा सुंदर धबधबा. निसर्गाच्या कुशीतील सर्वात सुंदर असे गड- किल्ले असलेल्या डोंगररांगेत हा धबधबा आहे.
वज्राई धबधबा- सातारा जिल्ह्यातील कास पठाराजवळ हा धबधबा असून पर्यटकांसाठी हा सुंदर धबधबा एक महत्वाचे आकर्षण आहे.
कुणे धबधबा - मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला माहिती असलेलं हे ठिकाण म्हणजे खंडाळा. खंडाळ्यात हा धबधबा असून तो भारतातील मोठ्या धबधब्यांपैकी एक आहे.