हल्लीच्या डिजिटल युगात प्रत्येकाला आपले नाते हे जगासमोर आणायचे असते. बरेचदा आपण आपल्या पार्टनरसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. ज्याचा आपल्या नात्यावर वाईट परिणाम होतो.
जे कपल्स सोशल मीडियावर पार्टनरसोबतचे (Partner) फोटो अपलोड करतात त्यांचे नाते हे अधिक कमकुवत होते. त्यामुळे त्याच्या नात्यात (Relation) दुरावा येतोय. याउलट जे कपल्स आपल्या नात्याला कोणत्याही डिजिटल प्लाटफॉर्मवर टाकत नाही ते नेहमी आनंदी राहातात.
अमेरिकेच्या कन्सास विद्यापीठात ३०० लग्न झालेले आणि लिव्ह इनमध्ये राहात असणाऱ्या जोडप्यांवर संशोधन करण्यात आले आहे. यामध्ये असे दिसून आले की, जी जोडपी (Couple) सोशल मीडियावर आपले फोटोज टाकतात त्यांच्या नात्यात दुरावा आढळून आला आहे. तसेच त्यांच्या भांडण देखील झालेली आहे.
सोशल मीडियावर बरेचदा आपल्या जवळचे किंवा ओळखीतले कपल्स बाहेर फिरायला जातात. त्यावेळी ते अप-टू-डेट सदळी माहिती सोशल मीडियावर टाकतात. ज्याचा परिणाम इतर कपल्स आपल्या नात्यावर करुन घेतात.
अमेरिकेच्या कन्सास विद्यापीठाने संशोधनासाठी देशभरातील ३०० जोडपी अर्थात ६०० लोकांना निवडले. हे जोडपे वेगवेगळ्या देशातील आणि जातीचे होते. यासाठी संशोधनाने ६ महिने यांच्यावर लक्ष ठेवले. याशिवाय जोडप्यांना वेळोवेळी समुपदेशनही करण्यात आले. यात त्यांचे नाते कोणत्या टप्प्यात आहे याची माहिती दिली. यात असे दिसून आले की, जे कपल्स सोशल मीडियाचा यूज कमी करतात. त्यांचे नाते अधिक मजबूत झालेले पाहायला मिळाले.
1. सोशल मीडियाचा नात्यावर कसा परिणाम होतो?
सोशल मीडिया आपल्या नात्याला अधिक कमकुवत बनवते. असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. याबाबतची माहिती दिली आहे. यामध्ये प्रत्येक ७ जोडप्यांपैकी १ जोडप्यांचा घटस्पोट हा सोशल मीडियामुळे झाला.
अमेरिकेत झालेल्या संशोधनातून असे आढळून आले आहे की, दर सात घटस्पोटांपैकी सोशल मीडिया जबाबदार आहे. यामुळे नात्यात दुरावा येतो, वाद होतात. अनेक पार्टनर यामुळे एकमेकांचे सोशल मीडिया चेक करतात.
2. कशी घ्याल नात्याची काळजी
1. नात्यात स्पेस कमी
बरेचदा अनेक जोडीदार सोशल मीडियावर अधिक अॅक्टिव्ह असल्यामुळे ते लक्ष
ठेवून असतात. ज्यामुळे सतत भांडण होऊ लागतात. किंवा सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोवर रिप्लाय न देणे, पोस्ट शेअर न करणे यांसारख्या गोष्टीमुळे नात्यात दूरावा येतो.
2. एकमेकांवर जळणे
अनेकदा सोशल मीडियावर पार्टनरने फोटो शेअर केल्यामुळे नात्यात जेलसी येते. एकमेकांचे फॉलवर्स, लाइक, कमेंटसारख्या गोष्टींमुळे भांडण होतात.
3. सोशल मीडियावर अनेक छोट्या गोष्टी शेअर करणे
अनेकजण आपला भावना सहज सोशल मीडियावर शेअर करतात. मूड ऑफ असणे, डू नॉट डिस्टर्ब, हॅप्पी, सॅड सारखे स्टेटस पोस्ट करतात. तज्ज्ञांच्या मते अशा वागण्यामुळे पार्टनरला त्रास होऊ शकतो, ज्यामुळे नाते कमकुवत होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.