नात्यात बरेचदा दुरावा येतो. सुरळीत सुरु असताना अचानक पार्टनरपैकी एकाला त्या नात्यात राहाण्याची इच्छा होत नाही. नातं म्हटलं की, त्यात रुसवे-फुगवे येतात. परंतु, हा राग कितपर्यंत ठेवायचा हे देखील आपल्याला समजायला हवे.
काही लोक नाते (Relation) नकळत खराब करतात. नात्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो तो विश्वास. कोणतेही नाते टिकते ते विश्वासावर. नातं घट्ट करण्यासाठी केवळ प्रेम पुरेसे नसते त्यात अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. जर तुम्ही देखील नात्यात काही चुका करत असतील तर वेळीच थांबवायला हव्या. ज्याचा परिणाम आपल्या नात्यावर होतो. ज्यामुळे नात्यात दूरावा येऊन पश्चातापाची वेळ येते. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर
1. अपेक्षा
बरेचदा आपण एकमेकांना आपल्या अपेक्षा बोलून दाखवत नाही. ज्यामुळे नात्यात दूरावा निर्माण होतो. काहीही न बोलता मनातल्या मनात इच्छा व्यक्त करतो. त्यामुळे गैरसमज निर्माण होतो. नात्यात अनेकदा आपल्याला असे वाटते की, पार्टनरने (Partner) समजून घ्यायला हवे. त्यामुळे नात्यात अंतर पडू लागते.
2. स्वत:ला बरोबर समजणे
नेहमीच आपण बरोबर ही चूक नात्यात करु नका. स्वत:ला सिद्ध करण्याच्या नादात तुम्ही तुमचे नाते बिघडवू शकता. त्यामुळे नात्यात भांडणे वाढू लागतात. एकमेकांना समजून घेण्याऐवजी स्वत:ला बरोबर आणि दुसऱ्याला चूक समजू लागतात.
3. दुर्लक्ष करणे
जोडीदार बरेचदा एकमेकांना दुर्लक्ष करतात. त्यामुळे नात्याचा पाया कमकुवत होऊ शकतो. त्यासाठी नात्यात कटू बोलणे टाळा. एकमेकांना आपल्याला समस्या सांगा. भावनिकरित्या नाते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. अन्यथा नात्यात तणावाचे (Stress) वातावरण निर्माण होऊ शकते.
4. गुण-दोष उकरुन काढणे
अनेकदा नात्यात आपण एकमेकांचे गुण-दोष उकरुन काढतो. त्यामुळे नात्यात दूरावा येतो. बरेचदा पार्टनर एकच गोष्ट घेऊन त्यावरती भांडण करत बसतो. त्यामुळे नात्यात अंतर वाढते.
5. मानसिकरित्या कमकुवत होणे
माझ्यासारखे व्हा ही मानसिकता नातेसंबंधात असणे अधिक चुकीचे असते. ज्यामुळे तुमच्या वागण्या बोलण्याचा नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होतो. ही मानसिकता तुमच्या जोडीदारावर दबाव आणू शकते. त्यामुळे तुमच्या नात्यावर परिणाम होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.