Relationship Tips : भांडण झाल्यानंतर जोडीदाराने चुकूनही बोलू नका या गोष्टी, वैवाहिक जीवनात येतील अडचणी

5 things Destroy your Relation : नात्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो तो विश्वास. कोणतही नाते हे विश्वासाच्या जोरावर टिकून राहाते. नातं अधिक घट्ट करण्यासाठी केवळ प्रेम पुरेसे नसून त्यात अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात.
Relationship Tips
Relationship TipsSaam Tv
Published On

Husband Wife Relation :

नात्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो तो विश्वास. कोणतही नाते हे विश्वासाच्या जोरावर टिकून राहाते. नातं अधिक घट्ट करण्यासाठी केवळ प्रेम पुरेसे नसून त्यात अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात.

लग्न झाल्यानंतर किंवा लग्न (Marriage) होण्यापूर्वी पार्टनरसोबत भांडण होते. असे म्हटले जाते की, ज्या नात्यात (Relation) भांडण नसते तिथे प्रेमही नसते. अनेकदा भांडण झाल्यानंतर कुणीतरी एकाने माघार घेणे गरजचे असते. बरेचदा भांडणात आपण एकमेकांना असे काही शब्द बोलून जातो. ज्यामुळे नात्यात दूरावा येतो. बोलताना काही गोष्टींचे भान ठेवले तर नात बिघडण्याऐवजी ते अधिक घट्ट होईल. जाणून घेऊया भांडण झाल्यानंतर पार्टनरला (Partner) कोणत्या गोष्टी बोलू नये.

1. बरेचदा नवरा किंवा बायको रागात असताना आपण सहज बोलून जातो की, माझा प्रियकर तुझ्यापेक्षा अधिक चांगला होता. असे म्हटल्याने नात्यात दूरावा येऊ शकतो. कधीही आपल्या जोडीदाराची तुलना इतरांसोबत करु नका.

Relationship Tips
Relationship Tips : या ५ कारणांमुळे तुमच्या नात्यात येऊ शकतो दुरावा...

2. मी तुझ्यावर प्रेम करुन चुक केली असे रागाच्या भरात बोलू नका. ही गोष्ट वारंवार नात्यात बोलू नका. ही गोष्ट तुमच्या पार्टनर सर्वात जास्त त्रासदायक ठरु शकते. त्यामुळे वैवाहिक नात्यात अडचणी येऊ शकतात.

3. अनेकदा भांडणात पार्टनरला असे वाटते की, समोरच्याने समजून घ्यावे किंवा भांडणाचे कारण जाणून घ्यावे. पण जर अशावेळी तुम्ही रागावून उलट सुलट बोलात तर नात सुधारण्याऐवजी बिघडू शकते. त्यामुळे कितीही रागात असला तरी पार्टनरचा आदरही करणे महत्त्वाचे आहे.

Relationship Tips
Break Up नंतर पार्टनर पुन्हा आलाय? या ५ लक्षणांवरुन कळेल तुमच्या नात्यातील अंतर...

4. तु माझ्या प्रेमाच्या लायक नाहीस असे बोलणे टाळा. रागात असताना आपण अशा अनेक चुका करतो. ज्याच्या आपल्या नात्यावर परिणाम होतो. रागाच्या भरात पार्टनरला काही शब्द बोलणे टाळा, अन्यथा वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होतील.

5. लग्न झाल्यानंतर किंवा लग्न होण्यापूर्वी पार्टनरसोबत भांडण होते. असे म्हटले जाते की, ज्या नात्यात भांडण नसते तिथे प्रेमही नसते. अनेकदा भांडण झाल्यानंतर कुणीतरी एकाने माघार घेणे गरजचे असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com