लाल की पांढरा तांदूळ, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणता आहे उत्तम?

White rice vs red rice : लाल आणि पांढऱ्या तांदळापैकी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणता तांदूळ उत्तम आहे आणि त्याचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत. जाणून घ्या
RED RICE VS WHITE RICE WHICH IS BETTER FOR BLOOD SUGAR CONTROL?
RED RICE VS WHITE RICE WHICH IS BETTER FOR BLOOD SUGAR CONTROL?saam tv
Published On: 

सध्या लोक आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये बरेच बदल करत आहेत. विशेषतः शहरी भागातील लोक पांढऱ्या तांदळाऐवजी लाल किंवा तपकिरी तांदूळ आहारात समाविष्ट करत आहेत. ज्यांना भात खाण्याची सवय सोडायची नाही, परंतु आरोग्याची काळजीही घ्यायची आहे, त्यांच्यासाठी लाल तांदूळ हा एक उत्तम पर्याय मानला जातो. लाल तांदूळ हा पांढऱ्याच नव्हे तर ब्राऊन राईसपेक्षाही अधिक फायदेशीर ठरतो.

लाल तांदळाचे पौष्टिक फायदे

१०० ग्रॅम लाल तांदळामध्ये ३५६ कॅलरीज, ७५.५ ग्रॅम कर्बोदके, ९ ग्रॅम प्रथिने, ३ ग्रॅम चरबी आणि तब्बल ११ ग्रॅम फायबर असते. यामध्ये पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ३ ते ४ पट अधिक फायबर असते आणि हे प्रमाण ब्राऊन राईसपेक्षाही जास्त असते.

RED RICE VS WHITE RICE WHICH IS BETTER FOR BLOOD SUGAR CONTROL?
Diwali 2026 : दिवाळीच्या फराळात वापरला जाणारा खवा शुद्ध की भेसळयुक्त? कसे ओळखाल

अँटीऑक्सिडंट्सचा स्रोत

लाल तांदळाचा रंग त्यात असणाऱ्या ‘अंथोसायनिन’ नावाच्या घटकामुळे लाल होतो. हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. यातील फिनॉल आणि अँथोसायनिन कर्बोदकांचे ग्लुकोजमध्ये वेगाने रूपांतर होण्यापासून रोखतात.

ब्लड शुगर आणि वजन नियंत्रण

लाल तांदळात असणारे ११ ग्रॅम फायबर ग्लुकोज रक्तात हळूहळू शोषले जाण्यास मदत करते. यामुळे वजन वेगाने वाढण्यास आणि मधुमेह रोखण्यास मदत होते. याशिवाय, हे खाल्ल्यावर पोट लवकर भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे भूक नियंत्रित राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते.

RED RICE VS WHITE RICE WHICH IS BETTER FOR BLOOD SUGAR CONTROL?
Diwali 2026 : दिवाळीत फटाक्यांच्या धुरापासून डोळ्यांचे संरक्षण कसे करावे? लालसरपणा, वेदना किंवा डोळ्यांतून पाणी येण्याकडे दुर्लक्ष करू नका

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते

उच्च फायबर प्रमाणामुळे हे रक्तातील फॅट आणि कोलेस्ट्रॉलचे शोषण रोखण्यास मदत करते आणि शरीराबाहेर टाकण्यास साहाय्य करते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते.

कोणाला खाण्याचा सल्ला दिला जातो?

लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांना पांढऱ्या तांदळाऐवजी लाल तांदूळ ४ ते ८ तास भिजवून देणे खूप फायदेशीर मानले जाते. ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा मधुमेह नियंत्रणात ठेवायचा आहे, त्यांनी आहारात लाल तांदळाचा समावेश करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.