Diwali 2026 : दिवाळीत फटाक्यांच्या धुरापासून डोळ्यांचे संरक्षण कसे करावे? लालसरपणा, वेदना किंवा डोळ्यांतून पाणी येण्याकडे दुर्लक्ष करू नका

how to protect eyes from firecracker smoke during Diwali: दिवाळीत फटाक्यांचा आनंद घेताना डोळ्यांची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. फटाक्यांमधून निघणारा धूर, धूळ आणि रसायनांमुळे डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
PROTECT YOUR EYES FROM FIRECRACKER SMOKE AND PREVENT INJURIES
PROTECT YOUR EYES FROM FIRECRACKER SMOKE AND PREVENT INJURIESsaam tv
Published On: 

दिवाळीचा सण आनंद, रोषणाई आणि उत्साहाने साजरा केला जातो. या उत्सवात फटाके फोडणे अनेकांसाठी आनंदाचा भाग असला, तरी यादरम्यान होणारे प्रदूषण आपल्या आरोग्यासाठी, विशेषतः डोळ्यांसाठी अत्यंत घातक ठरू शकते. फटाक्यांच्या धुरामध्ये अनेक विषारी रसायने आणि सूक्ष्म कण असतात, ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे या काळात डोळ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

डोळे अजिबात चोळू नका: फटाक्यांचा धूर डोळ्यात गेल्यास किंवा जळजळ होऊ लागल्यास अनेकजण लगेच डोळे चोळतात. असे केल्याने डोळ्यांच्या नाजूक पेशींना इजा होऊ शकते आणि संसर्ग वाढू शकतो.

PROTECT YOUR EYES FROM FIRECRACKER SMOKE AND PREVENT INJURIES
जिवलग जिवाच्या मित्रालाही सांगू नका तुमच्या आयुष्याच्या या ५ गोष्टी, अन्यथा डोक्याला मारावा लागेल हाथ

स्वच्छ पाण्याने धुवा: डोळ्यांत धूर गेल्यास किंवा जळजळ जाणवल्यास डोळे थंड आणि स्वच्छ पाण्याने हळूवार धुवावेत. यामुळे डोळ्यांतील धूर आणि कडक कण बाहेर पडण्यास मदत होते.

सुरक्षित अंतर ठेवा आणि चष्मा वापर करा: फटाके फोडताना किंवा त्याच्या जवळ असताना नेहमी सुरक्षित अंतर ठेवा. शक्य असल्यास डोळ्यांच्या संरक्षणासाठी साधा चष्मा वापरा, जेणेकरून उडणाऱ्या ठिणग्या आणि थेट धूर डोळ्यांपर्यंत पोहोचणार नाही.

ही लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नका

जर फटाक्यांच्या धुरामुळे किंवा संपर्कामुळे डोळ्यांत सतत तीव्र वेदना होत असतील, डोळे लाल झाले असतील किंवा डोळ्यांतून सतत पाणी वाहत असेल, तर या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. ही लक्षणे डोळ्यांच्या संसर्गाची किंवा कॉर्नियाला दुखापत झाल्याची चिन्हे असू शकतात.

PROTECT YOUR EYES FROM FIRECRACKER SMOKE AND PREVENT INJURIES
Sunflower Seeds : दुध आणि मांसाहारापेक्षा जास्त ताकद,'या' बिया ठरतील आरोग्यासाठी वरदान

अशा प्रकारची कोणतीही समस्या जाणवल्यास घरगुती उपाय करण्यापेक्षा तात्काळ एखाद्या अनुभवी नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते आय ड्रॉप्स किंवा उपचार घेणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुरक्षित ठरते. आपली थोडीशी काळजी आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला या उत्सवात सुरक्षित ठेवू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.