Sunflower Seeds : दुध आणि मांसाहारापेक्षा जास्त ताकद,'या' बिया ठरतील आरोग्यासाठी वरदान

SUNFLOWER SEEDS HEALTH BENEFITS : शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण झाल्यास अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. शरीराला निरोगी ठेवायचे असेल, तर न्यूट्रिशनयुक्त पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे.
SUNFLOWER SEEDS HEALTH BENEFITS AND NUTRITION GUIDE
SUNFLOWER SEEDS HEALTH BENEFITS AND NUTRITION GUIDE saam tv
Published On: 

तुम्हाला माहित आहे का शरीराला एनर्जेटीक ठेवण्यासाठी अनेक बीया उपयोगी असतात. यामध्येच सुर्यफुलाच्या बीया तीतक्याच फायदेशीर मानल्या जातात. शरीराला पोषण आणि ऊर्जा देण्याच्या बाबतीत सनफ्लॉवर सीड्स अतिशय फायदेशीर आहेत. चिकन आणि मटनपेक्षाही या बियांमध्ये अधिक ताकद असल्याचे मानले जाते. या बियांचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत, ते जाणून घ्या. या बिया तुम्ही रोजच्या आहारात सामिल करु शकता.

व्हिटॅमिन बी६चा उत्तम स्रोत

सनफ्लॉवर सीड्समध्ये व्हिटॅमिन बी६ भरपूर प्रमाणात असते. हे तत्त्व मज्जासंस्थेचे कार्य सुधारण्यास आणि पचनाच्या समस्या दूर करण्यास मदत करते. तसेच विकरे आणि हार्मोन्सच्या निर्मितीमध्येही ते उपयुक्त ठरते. बिया भिजवून खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन बी६ पूर्णपणे मिळते.

SUNFLOWER SEEDS HEALTH BENEFITS AND NUTRITION GUIDE
जिवलग जिवाच्या मित्रालाही सांगू नका तुमच्या आयुष्याच्या या ५ गोष्टी, अन्यथा डोक्याला मारावा लागेल हाथ

तरुण त्वचा आणि व्हिटॅमिन ई

त्वचेवर सुरकुत्या पडण्यापासून रोखण्यासाठी आणि दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी व्हिटॅमिन ई गरजेचे असते. बदाममध्ये २८ मिलिग्रॅम व्हिटॅमिन ई असते, तर सुर्यफुलाच्या बियांमध्ये ३५ मिलिग्रॅमपर्यंत आढळते. त्यामुळे रोज या बियांचे सेवन केल्यास शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन ई मिळते.

मॅग्नेशियमची कमतरता दूर होते

शरीराला आवश्यक असणाऱ्या खनिजांपैकी मॅग्नेशियम एक आहे. आजकाल अनेकांमध्ये मॅग्नेशियमची कमतरता दिसून येते. सुर्यफुलाच्या बिया या खनिजाची कमतरता भरून काढण्यासाठी उत्तम स्त्रोत मानल्या जातात.

SUNFLOWER SEEDS HEALTH BENEFITS AND NUTRITION GUIDE
पॅनिक अटॅक म्हणजे नेमके काय? जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि उपाय

खाण्याची योग्य पद्धत

या बिया सेवन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्या रात्रभर भिजवून खाणे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीर सर्व पोषक घटक सहज शोषून घेते. प्रवासात किंवा घाईत असताना भाजलेल्या बियांचे सेवनही करता येते. ज्यांना वजन वाढवायचे आहे, ते रोज २५ ते ४० ग्रॅमपर्यंत या बिया खाऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.