पॅनिक अटॅक म्हणजे नेमके काय? जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि उपाय

panic attack symptom : पॅनिक अटॅक दरम्यान कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय अचानक तीव्र भीती किंवा घबराट जाणवू लागते. यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे आणि बेचैनीसारखी लक्षणे दिसतात.
 PANIC ATTACKS SYMPTOMS, CAUSES, AND EFFECTIVE RELIEF METHODS
PANIC ATTACKS SYMPTOMS, CAUSES, AND EFFECTIVE RELIEF METHODSSAAM TV
Published On: 

पैनिक अटॅक हा अचानक येणारा तीव्र भीती किंवा घबराटीचा एक अतिशय त्रासदायक अनुभव आहे. यामध्ये कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय किंवा धोक्याशिवाय शरीरात अशी प्रतिक्रिया होते, जसे की आपण एखाद्या मोठ्या संकटात अडकलो आहोत.

असा अटॅक आल्यास अचानक श्वास घेण्यास खूप त्रास होतो किंवा श्वास अतिशय वेगाने चालू लागतो. यासोबतच खूप घाम सुटणे, हात-पाय थरथरणे, छातीत दाब किंवा जडपणा जाणवणे आणि तीव्र अस्वस्थता निर्माण होते. ही लक्षणे सहसा १० ते १५ मिनिटांपर्यंत टिकतात आणि त्यानंतर स्वतःहून कमी होतात.

 PANIC ATTACKS SYMPTOMS, CAUSES, AND EFFECTIVE RELIEF METHODS
Junk Food Risks : चिप्स-बर्गरची सवय मुलांच्या मेंदूला करतेय खिळखिळी, नवीन संशोधनातील धक्कादायक माहिती

मेंदूतील काही रसायनांचा समतोल बिघडल्यामुळे, अतिप्रमाणात तणाव किंवा जुन्या आघातामुळे पॅनिक अटॅक येऊ शकतो. जरी हा अटॅक जीवघेणा नसला, तरी तो वारंवार येत असल्यास किंवा त्याची भीती वाटत असल्यास डॉक्टरांचा किंवा मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे ठरते.

पॅनिक अटॅकची प्रमुख लक्षणे

  • श्वास घेण्यास अडचण निर्माण होणे किंवा खूप वेगाने श्वास घेणे.

  • अचानक तीव्र घबराट आणि अस्वस्थता जाणवणे.

  • चक्कर येणे, खूप घाम सुटणे किंवा हात-पाय थरथरणे.

  • छातीत दाब किंवा जडपणा जाणवणे.

पॅनिक अटॅकची कारणे

  • मेंदूतील रसायनांचा समतोल बिघडल्यास पैनिक अटॅक येऊ शकतो.

  • अतिप्रमाणात तणाव, जुना मानसिक आघात , किंवा आयुष्यात अचानक आलेला मोठा बदल.

  • जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन करणे किंवा आनुवंशिक कारणे.

 PANIC ATTACKS SYMPTOMS, CAUSES, AND EFFECTIVE RELIEF METHODS
Sprouts Benefits : रोज एक मूठभर स्प्राउट्स खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे

काय उपचार आणि काळजी घ्यावी?

डॉक्टरांचा सल्ला:

जरी काही रुग्णांमध्ये ही लक्षणे स्वतःहून कमी होत असली, तरी योग्य तपासणीसाठी एकदा डॉक्टरांना नक्की भेट द्यावे. यात हृदयविकाराची शक्यता तपासण्यासाठी कार्डियाक असेसमेंट केले जाते.

औषधोपचार आणि काऊन्सिलिंग:

गरज भासल्यास डॉक्टर अँटी-डिप्रेसंट्स किंवा अँटी-अंक्झायटी औषधे देतात आणि सोबतच काऊन्सिलिंग व जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला देतात.

अटॅक आल्यास काय करावे?

  • शांत ठिकाणी बसा आणि गर्दी करू नका.

  • नाकावाटे हळूहळू लांब आणि खोल श्वास घेण्यास सांगा.

  • चेहरा आणि मानेवर थंड पाण्याच्या शिंतोडे मारा किंवा ओला रुमाल ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.