Sprouts Benefits : रोज एक मूठभर स्प्राउट्स खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे

What Happens When You Eat Sprouts Daily : मोड आलेली कडधान्ये खाणे चवीसोबतच आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. आहारात दररोज याचा समावेश केल्याने पचन सुधारण्यापासून ते वजन नियंत्रित ठेवण्यापर्यंत अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
What Happens When You Eat Sprouts Daily
What Happens When You Eat Sprouts Dailysaam tv
Published On: 

मोड आलेली कडधान्ये खाण्यामध्ये चवदार असण्यासोबतच आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. त्यामुळे फिटनेसबाबत जागरूक असणारे लोक आपल्या आहारात यांचा आवर्जून यांचा समावेश करतात. स्प्राउट्सचे नियमित सेवन केल्यास शरीराला प्रोटीन, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे सहज मिळतात. आहारात दररोज स्प्राउट्सचा समावेश केल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्या देखील दूर राहतात. मोड आलेली कडधान्य खाण्याचे मुख्य फायदे कोणते आणि त्याचा शरीराला कसा उपयोग होते ते जाणून घ्या.

पचन आणि चयापचय क्रिया सुधारते

स्प्राउट्समध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते. बद्धकोष्ठता आणि इतर पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.तसेच,हे चयापचय वाढवण्यास मदत करते.

What Happens When You Eat Sprouts Daily
Kitchen Cleaning : स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यासाठी सोप्या आणि प्रभावी टिप्स, जाणून घ्या

रोगप्रतिकारशक्ती वाढते

यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते, जे शरीराला रोगांविरुद्ध लढण्यास मदत करतात आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि थकवा जाणवत नाही.

प्रथिनांचा उत्तम स्रोत

स्प्राउट्समध्ये प्रोटीन चांगल्या प्रमाणात असते. स्नायूंची वाढ, शरीराची रिकव्हरी आणि पोट दीर्घकाळ भरलेले ठेवण्यासाठी हे उपयुक्त ठरते. जिम किंवा वर्कआउट करणाऱ्या लोकांसाठी हा एक नैसर्गिक आणि आरोग्यदायी प्रोटीन स्रोत आहे.

What Happens When You Eat Sprouts Daily
Green Peas : हिरवे वाटाणे वर्षभर ठेवा ताजे आणि टवटवीत, जाणून घ्या साठवण्याच्या दोन सोप्या पद्धती

वजन नियंत्रण आणि हृदयाचे आरोग्य

स्प्राउट्स खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. तसेच, यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर रक्तदाब (ब्लड प्रेशर) आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

स्प्राउट्समध्ये व्हिटॅमिन-ई आणि खनिजे असतात, जे त्वचा चमकदार बनवतात आणि केस मजबूत करतात.

आहारात स्प्राउट्सचा समावेश कसा करावा?

तुम्ही स्प्राउट्सचे सेवन सॅलड, सँडविच किंवा हलके फ्राय करून करू शकता. मूग,चणा आणि मटकीचे स्प्राउट्स सर्वाधिक पौष्टिक मानले जातात.

टीप: ही माहिती केवळ सामान्य माहितीसाठी असून कोणत्याही आरोग्य समस्येसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.