Diwali 2026 : दिवाळीच्या फराळात वापरला जाणारा खवा शुद्ध की भेसळयुक्त? कसे ओळखाल

pure mawa test : आपल्याकडे दिवाळीच्या फराळातील करंजी, गुलाब जामुन किंवा बर्फी यांसारख्या गोडाच्या पदार्थांमध्ये खव्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
HOW TO TEST MAWA PURITY AT HOME FOR SAFE DIWALI SWEETS
HOW TO TEST MAWA PURITY AT HOME FOR SAFE DIWALI SWEETSsaam tv
Published On: 

दिवाळीचा सण सुरु झाला आहे. यातच अनेकांच्या घरात फराळ बनवण्याची लगबग सुरु झाली आहे. फराळा मध्ये काहीतरी गोड बनवताना आपण अनेकदा खव्याचा वापर करतो. पण आपण वापरत असलेला माव्यामध्ये भेसळ नाही ना? हे माहिती करुन घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

दिवाळीच्या सणात बाजारात मिळणाऱ्या खव्यामध्ये होणारी भेसळ आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. सणाच्या काळात जास्त नफ्यासाठी खव्यामध्ये डिटर्जंट, स्टार्च, सिंथेटिक दूध आणि वनस्पती तेल मिसळले जाते, ज्यामुळे अन्नविषबाधा आणि पोटात इन्फेक्शनसारख्या गंभीर समस्या होऊ शकतात.

HOW TO TEST MAWA PURITY AT HOME FOR SAFE DIWALI SWEETS
Diwali 2026 : दिवाळीत फटाक्यांच्या धुरापासून डोळ्यांचे संरक्षण कसे करावे? लालसरपणा, वेदना किंवा डोळ्यांतून पाणी येण्याकडे दुर्लक्ष करू नका

बाजारातून आणलेला खवा असली आहे की नकली? ते ओळखण्याचे 5 पर्याय :

खव्यातील स्टार्चची तपासणी

खव्यामध्ये मैदा, आरारोट किंवा उकडलेल्या बटाट्याचा स्टार्च मिसळलेला असतो का हे पाहण्यासाठी एक चमचा खवा थोड्या पाण्यात उकळून थंड करा. त्यानंतर त्यात आयोडीन टिंचरचे काही थेंब टाका. जर माव्याचा रंग निळा झाला, तर त्यात स्टार्चची भेसळ आहे हे समजावे. अस्सल खवा आयोडीनच्या संपर्कात आल्यावर आपला रंग बदलत नाही.

हातावर चोळून पाहणे

थोडासा खवा आपल्या हाताच्या वरच्या भागावर किंवा तळहातावर ठेवून चोळा. जर खवा हळूहळू तेल सोडत असेल, तर तो अस्सल आहे. याच्या उलट, जर तो हातावर चोळल्यावर कोरडा पडला आणि त्याला साबनासारखा वास येऊ लागला तर तो नकली आहे.

टेस्ट आणि स्मेल

थोडासा खवा बोटावर घेऊन चाखून पहा. अस्सल माव्याची चव हलकी गोड असते आणि त्याला दुधासारखा सुवास येतो. तर नकली माव्यामधून केमिकल, डिटर्जंट किंवा शिळ्या तेलाचा दुर्गंध येतो आणि त्याची चव काहीशी कवट किंवा तुरट लागते.

HOW TO TEST MAWA PURITY AT HOME FOR SAFE DIWALI SWEETS
Train Travel Rules: प्रवासात बॅग ट्रेनमध्ये विसरलात? घाबरू नका, 'या' सोप्या पद्धतीने परत मिळेल तुमचे सामान

पाण्यात विरघळवून पाहणे

एका ग्लासात कोमट पाणी घेऊन त्यात एक चमचा खवा चांगला मिसळा आणि काही वेळ तसेच राहू द्या. अस्सल खवा पाण्यात पूर्णपणे विरघळतो आणि पाण्याचा रंग दुधासारखा होतो. पण जर माव्यामध्ये स्टार्च किंवा सिंथेटिक पावडर असेल, तर ती विरघळत नाही आणि तळाशी बसून राहते.

गरम करून तपासणी

थोडासा मावा कढईत किंवा पॅनमध्ये मंद आचेवर गरम करा. अस्सल खवा गरम केल्यावर लगेच तूप सोडतो. मात्र, भेसळयुक्त मावा गरम करताच पटकन काळा पडू लागतो किंवा जळून कडक होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.