Train Travel Rules: प्रवासात बॅग ट्रेनमध्ये विसरलात? घाबरू नका, 'या' सोप्या पद्धतीने परत मिळेल तुमचे सामान

What steps to take immediately if you leave your luggage inside a train: ट्रेनमध्ये चुकून सामान राहिलं तर काय कराल? सामान परत मिळवण्याच्या सोप्या ट्रिक्स जाणून घ्या.
What steps to take immediately if you leave your luggage inside a train
What steps to take immediately if you leave your luggage inside a train
Published On: 

ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान अनेकदा घाईगडबडीत आपण ट्रेनमधून उतरतो आणि बॅग ट्रेनमध्येच विसरतो असे अनेकांसोबत घडते. ट्रेनमध्ये बॅग किंवा पिशवी विसरल्यानंतर नेमकं करायचं काय? ट्रेनमध्ये राहिलेली बॅग, पिशवी कशी मिळवायची? असा प्रश्न पडतो आणि आपण टेन्शनमध्ये जातो, मात्र आता जास्त घाबरून जाण्याची गरज नाही. जर तुम्ही अशावेळी थोडासा विचार केला आणि लगेचच पावले उचलली तर तुम्हाला ट्रेनमध्ये विसरलेलं तुमचं सामान परत मिळेल.

भारतीय रेल्वेने यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. एखादी व्यक्ती जर ट्रेनमध्ये सामान विसरली असेल तर नेमका काय केले पाहिजे? ते सांगितले आहे.

What steps to take immediately if you leave your luggage inside a train
Palm Itching Meaning For Men And Women: स्त्रियांच्या तळहाताला खाज सुटली की पैसा मिळतो तर, पुरूषांबाबत शुभ की अशुभ?

जर तुम्ही ट्रेनमधून उतरलात आणि नंतर तुमच्या लक्षात आले की तुमचे सामान ट्रेनमध्ये राहिले आहे तर तुम्ही स्टेशन मास्तरकडे जाऊन त्यांना कळवणे महत्वाचे आहे. त्यानंतर ताबडतोब सुरक्षा रक्षा दलाच्या (RPF) 139 हेल्पलाईन क्रमाकांवर संपर्क साधा आणि तुम्ही कोणत्या डब्यात होतात, तसेच तुमचे कोणते सामान राहिले आहे याची माहिती त्यांना द्या.

जर तुम्हाला शक्य असेल तर , तुमच्या कंपार्टमेंट अटेंडंट किंवा टीटीई यांच्याशी संपर्क साधा. त्यांना वेळेवर कळल्यास, ते तुमचे सामान सुरक्षित ठेवू शकतील.

रेल्वेची ऑनलाईन सुविधा

रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी खास ऑपरेश अमानत चालवते ज्यामध्ये सुरक्षा दल हरवलेल्या सामानांचे फोटो क्लिक करून वेबसाईटवर अपलोड करते.

What steps to take immediately if you leave your luggage inside a train
Vastu Tips For Work From Home: तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करताय? आत्ताच सोडा ही सवय, करिअर आणि प्रगतीवर होईल परिणाम

काय आहे प्रोसेस?

मिशन अमानत Mission Amanat या पेजवर ट्रेन आणि तारीख हि माहिती अपडेट केल्यानंतर सामानाचे फोटो अपलोड करा. त्यानंतर तुम्ही संबंधित स्टेशन आरपीएफ तसेच पोलिस यांच्याशी संपर्क करून सामान मिळवू शकता.

सामान परत मिळवण्यासाठी प्रोसेस

  • सामान परत मिळवण्यासाठी तुम्ही सोपी प्रक्रिया करणे महत्वाचे आहे.

  • सर्वातआधी जीआरपी पोलिस स्टेशन यांची भेट घ्या आणि तुमचे जे सामान हरवले आहे त्याविषयी लेखी पत्र द्या.

  • सामान परत मिळवताना तुम्ही आधारकार्ड आणि ट्रेनचे तिकिट सोबत ठेवावे.

  • आरपीएफ ऑफिसर तुम्हाला काही प्रश्न विचारतील जसे की बॅगमध्ये काय काय होते त्यांची अचूक उत्तरे द्या. यावरून हरवलेली बॅग तुमची आहे याची खात्री राहील.

  • प्रवासात बॅग हरवू नये म्हणून काय काळजी घ्याल?

  • जर तुम्हालाही ट्रेनमध्ये बॅग हरवण्याची भिती असेल तर योग्य वेळीच खबरदारी घेणे महत्वाचे आहे.

  • तुमचे स्टेशन येण्यापूर्वी १५ ते २० मिनिटांआधी अलार्म सेट करून ठेवा.

  • तुमच्या बॅगेवर नाव आणि फोननंबरचा टॅग लिहून ठेवा.

  • ट्रेनमधून उतरण्यापूर्वी ट्रेनच्या सीटखाली व वरच्या रॅकवर पाहून घ्या की तुमचे सामान काही राहिले नाही ना.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.