Liver Transplant Signs: लिव्हर फेल होत असल्याचे ‘हे’ संकेत वेळीच ओळखा; जाणून घ्या ट्रान्सप्लांटची वेळ आलीय का?

liver transplant: लिव्हरचा आजार गंभीर झाल्यास कावीळ, पोटात पाणी साचणे, सतत थकवा, वागण्यात बदल, रक्तस्राव आणि वारंवार संसर्ग यांसारखी लक्षणं दिसू शकतात. ही लक्षणं दिसल्यास वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि आवश्यक तपासण्या करून घेणं महत्त्वाचं आहे.
Liver Transplant Signs
Liver Transplant Signssaam tv
Published On

शरीरातील अनेक महत्त्वाची कामं लिव्हर म्हणजेच यकृत करतं. मात्र दीर्घकाळाचा आजार, अचानक होणारं लिव्हर फेल्युअर किंवा लिव्हरशी संबंधित गंभीर समस्या यामुळे यकृताची काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते. काही वेळा लिव्हरचा आजार सुरुवातीला फारशी लक्षणं दाखवत नाही. त्यामुळे समस्या वाढल्यानंतरच अनेकांना त्याची जाणीव होते. अशावेळी शरीरात दिसणारे काही बदल वेळीच ओळखणं महत्त्वाचं ठरतं.

याचा अर्थ अशी प्रत्येक लक्षणं दिसली म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट करावंच लागेल असं नाही. मात्र अशी लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. वेळेत तपासणी आणि उपचार मिळाल्यास आजार नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

Liver Transplant Signs
Eye health tips: ही एक सवय डोळ्यांसाठी ठरू शकते घातक; संसर्ग वाढल्यास दृष्टी गमवाण्याचाही धोका

लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज कधी भासते?

जेव्हा लिव्हर इतकं खराब होतं की, शरीरासाठी आवश्यक असलेली कामं ते व्यवस्थित करू शकत नाही, तेव्हा लिव्हर ट्रान्सप्लांटचा विचार केला जातो. लिव्हर सिरोसिस, दीर्घकाळाचा हिपॅटायटिस, फॅटी लिव्हरचा गंभीर आजार, दारूमुळे झालेलं लिव्हरचं नुकसान, ऑटोइम्यून लिव्हर डिसीज, शरीरातील काही चयापचयाशी संबंधित आजार आणि अचानक होणारं लिव्हर फेल्युअर यामुळे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

ट्रान्सप्लांटची गरज आहे की नाही हे डॉक्टर अनेक गोष्टी तपासून ठरवतात. यामध्ये रुग्णाची लक्षणं, रक्ताच्या तपासण्या, स्कॅन किंवा इतर इमेजिंग तपासण्या, MELD स्कोअर आणि रुग्णाची एकूण प्रकृती यांचा समावेश असतो.

Liver Transplant Signs
Diabetes warning signs: हात-पाय वारंवार थंड पडतात? थंडीमुळे होतंय असं समजून दुर्लक्ष करू नका; शरीर देतंय मोठ्या आजाराचा संकेत!

लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज भासू शकते, अशी लक्षणं कोणती?

Frontiers in Medicine मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, लिव्हर सिरोसिसचा आजार खूप पुढे गेल्यावर काही गंभीर समस्या दिसू लागतात. यामध्ये पोटात पाणी साचणं (Ascites), कावीळ आणि मेंदूच्या कार्यावर परिणाम होणं यांचा समावेश होतो. ही लक्षणं लिव्हरचा आजार गंभीर टप्प्यावर पोहोचल्याचे संकेत असू शकतात.

सतत थकवा, अशक्तपणा आणि भूक कमी होणं

सिरोसिससारखा लिव्हरचा आजार अनेक वर्षं राहिल्यास त्याची लक्षणं हळूहळू वाढू शकतात. यामध्ये-

  • सतत थकवा जाणवणं

  • अशक्तपणा जाणवणं

  • भूक कमी होणं

  • वजन कमी होणं

  • त्वचा आणि डोळे पिवळे होणं

  • सहज अंगावर निळे डाग पडणे किंवा रक्तस्राव होणं

यांचा समावेश होतो.

उपचार करूनही ही लक्षणं कमी होत नसतील आणि त्यांची तीव्रता वाढत असेल, तर लिव्हरची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचा संकेत असू शकतो.

सतत किंवा वाढत जाणारी कावीळ

लिव्हर शरीरातील बिलिरुबिन नावाचा पदार्थ योग्य प्रकारे हाताळू शकत नसेल तर त्वचा आणि डोळे पिवळे पडतात. यालाच कावीळ म्हणतात. काही वेळा कावीळ तात्पुरती असू शकते. मात्र त्वचा आणि डोळ्यांचा पिवळेपणा सतत राहणं किंवा वाढत जाणं हे लिव्हरच्या कामात अडथळा असल्याचं महत्त्वाचं लक्षण असू शकतं.

कावीळसोबत-

  • लघवीचा रंग गडद होणं

  • शौचाचा रंग फिकट होणं

  • पोटाला सूज येणं

अशी लक्षणंही दिसत असतील, तर लिव्हरचा आजार गंभीर अवस्थेत असल्याची शक्यता असते. अशावेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे.

Liver Transplant Signs
Cardamom for Diabetes: 1 वेलचीमुळे शुगर लेव्हल होऊ शकते कमी, डायबिटीजच्या रुग्णांनी अशा पद्धतीने करा सेवन!

पोटात पाणी साचणं

लिव्हर सिरोसिसमध्ये Ascites म्हणजेच पोटात पाणी साचण्याची समस्या अनेकदा दिसते. लिव्हरमधून रक्त वाहून नेणाऱ्या नसांमध्ये दाब वाढणे आणि शरीरासाठी आवश्यक प्रोटीनची निर्मिती कमी होणे यामुळे पोटात द्रव जमा होऊ शकतो.

औषधं घेऊनही पोटातील पाणी कमी होत नसेल किंवा वारंवार पाणी काढावं लागत असेल, तर डॉक्टर लिव्हर ट्रान्सप्लांटचा विचार करू शकतात. पोटात होणाऱ्या अशा संसर्गाला Spontaneous Bacterial Peritonitis (SBP) असं म्हटलं जातं.

वागण्यात बदल होणं

लिव्हरचं एक महत्त्वाचं काम म्हणजे रक्तातील शरीराला घातक ठरू शकणारे पदार्थ बाहेर काढण्यास मदत करणं. लिव्हर खूप खराब झाल्यास हे पदार्थ रक्तात वाढू शकतात आणि त्याचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. या स्थितीला Hepatic Encephalopathy म्हणतात.

समस्या खूप गंभीर झाल्यास व्यक्ती बेशुद्धावस्थेतही जाऊ शकते. ही समस्या वारंवार होत असेल किंवा तीव्र स्वरूपाची असेल तर लिव्हरची स्थिती बिघडत असल्याचं ते महत्त्वाचं लक्षण असू शकतं आणि ट्रान्सप्लांटसाठी तपासणी केली जाऊ शकते.

वारंवार होणारे गंभीर संसर्ग

लिव्हरचा आजार खूप वाढल्यास शरीराची संसर्गाशी लढण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे अशा रुग्णांना वारंवार संसर्ग होण्याचा धोका असतो. वारंवार संसर्ग होत असेलतर लिव्हर शरीराची सामान्य कामं व्यवस्थित पार पाडत नसल्याचं हे एक संकेत असू शकतं.

Liver Transplant Signs
Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com