Diabetes warning signs: हात-पाय वारंवार थंड पडतात? थंडीमुळे होतंय असं समजून दुर्लक्ष करू नका; शरीर देतंय मोठ्या आजाराचा संकेत!

Diabetes and cold feet: डायबिटीजच्या रुग्णांचे हात-पाय वारंवार थंड पडत असतील तर त्यामागे रक्ताभिसरण कमी होणे किंवा नसांवर परिणाम झालेला असू शकतो. मुंग्या, झिणझिण्या आणि जखम उशिरा भरणे अशी लक्षणे दिसल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
Diabetes warning signs
Diabetes warning signssaam tv
Published On

सर्दीच्या दिवसांत अनेकांचे हात-पाय थंड पडतात. त्यामुळे डायबिटीज असलेले रुग्णही ही सामान्य गोष्ट आहे, असं समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र डायबिटीजच्या रुग्णांचे हात-पाय वारंवार थंड पडत असतील तर त्यामागे शरीरातील रक्ताभिसरणाची समस्या किंवा नसांशी संबंधित त्रास असू शकतो. त्यामुळे हे लक्षण गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे.

आकाश हेल्थकेअरमधील इंटरनल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. विक्रमजीत सिंह यांच्या मते, डायबिटीजच्या रुग्णांमध्ये हात-पाय थंड पडणं हे नसांना इजा झाल्याचं किंवा शरीराच्या त्या भागात रक्ताचा प्रवाह कमी झाल्याचे लक्षण असू शकतं.

Diabetes warning signs
Heart Attack in Women: 70% महिलांकडून हार्ट अटॅकची 'ही' लक्षणं दुर्लक्षित; अचानक जाणवणारा थकवा असू शकतो मोठा रेड फ्लॅग

डायबिटीजमध्ये हात-पाय थंड का पडतात?

डायबिटीजमध्ये रक्तातील साखरेचं प्रमाण दीर्घकाळ जास्त राहिल्यास त्याचा परिणाम रक्तवाहिन्यांवर होतो. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊ शकतात. परिणामी हात आणि पायांपर्यंत पुरेसं रक्त पोहोचत नाही. यामुळे हात-पाय थंड पडू शकतात. यासोबतच हात-पायांमध्ये मुंग्या येणे किंवा झिणझिण्या येण्याची समस्याही होऊ शकते.

हात-पाय थंड पडणं गॅंग्रीनचा संकेत

डॉक्टरांच्या मते, डायबिटीजच्या रुग्णांमध्ये हात-पाय थंड पडणं हे रक्ताचा प्रवाह कमी झाल्याचं महत्त्वाचं लक्षण असू शकतं. त्यामुळे हे लक्षण दुर्लक्षित करू नये. शरीराच्या एखाद्या भागात रक्तपुरवठा कमी झाल्यास पायाला झालेली जखम भरून येण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. अशा वेळी जखमेमध्ये संसर्ग होण्याचा धोका वाढतो. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास ही समस्या वाढून पुढे गॅंग्रीनसारखी गंभीर अवस्था निर्माण होऊ शकते.

Diabetes warning signs
Heart Failure: केवळ छातीत दुखणं नाही! ही 6 लक्षणं दिसली तर समजा हार्ट फेल होणारे

नसांवरही होऊ शकतो परिणाम

डायबिटीजच्या रुग्णांचे हात-पाय थंड पडण्यामागे नसांना झालेली इजाही एक कारण असू शकते. याला डायबिटीज न्यूरोपॅथी असं म्हणतात. रक्तातील साखरेचं प्रमाण दीर्घकाळ जास्त राहिल्यास शरीरातील नसांवर परिणाम होतो आणि त्या कमजोर होऊ लागतात. त्यामुळे रुग्णाला थंडी, गरमपणा किंवा वेदना यांचा नेहमीसारखा अंदाज येत नाही.

जर हात-पाय थंड पडण्यासोबत मुंग्या येणं किंवा झिणझिण्या येत असतील तर हे नसांवर परिणाम झाल्याचं महत्त्वाचं लक्षण असू शकतं.

डायबिटीजच्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी?

सर्दीच्या दिवसांत डायबिटीजच्या रुग्णांनी हात-पाय उबदार ठेवण्याची काळजी घ्यावी. त्यासोबतच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Diabetes warning signs
Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com