Heart Attack in Women: 70% महिलांकडून हार्ट अटॅकची 'ही' लक्षणं दुर्लक्षित; अचानक जाणवणारा थकवा असू शकतो मोठा रेड फ्लॅग

Early signs of heart attack in women: महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं नेहमी छातीत दुखण्यापुरती मर्यादित नसतात. थकवा, श्वास घेण्यास त्रास, मळमळ, चक्कर किंवा जबडा, पाठ आणि हातात वेदना ही लक्षणंही दिसू शकतात. महिलांनी कोणती चिन्हं ओळखावीत आणि धोका कसा कमी करावा हे पाहूयात.
Heart Attack in Women
Heart Attack in Womensaam tv
Published On

हार्ट अटॅक म्हटलं की सर्वात आधी डोळ्यासमोर येतं ते छातीत दुखणं. मात्र महिलांच्या बाबतीत हार्ट अटॅकची लक्षणं नेहमीच अशी स्पष्ट दिसतील असं नाही. काही वेळा शरीरात जाणवणारे अगदी साधे बदलही हृदयाशी संबंधित गंभीर समस्येचं संकेत असू शकतात. काही महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्याच्या काही आठवडे आधीपासूनच अशी लक्षणं दिसू शकतात.

नॅशनल हार्ट फेल्युअर रजिस्ट्री (NHFR) नुसार, हार्ट फेल्युअरमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी जवळपास एक तृतीयांश महिला आहेत. भारतात महिलांमधील हृदयाच्या आजारांचं निदान अनेकदा उशिरा होतं. हृदयरोग हा महिलांच्या मृत्यूचं एक महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे महिलांनी हार्ट अटॅकची सुरुवातीची लक्षणं ओळखणं गरजेचं आहे.

Heart Attack in Women
Heart failure: हार्ट फेल्युअरचं कारण फक्त हार्ट अटॅक नाही; हृदयात 'हा' घटक साचल्यानेही वाढतोय धोका

हार्ट अटॅकच्या लक्षणांकडे ७० टक्क्यांहून अधिक महिला दुर्लक्ष करतात. महिलांमध्ये दिसणारी ही लक्षणं अनेकदा नेहमीपेक्षा वेगळी असू शकतात. त्यामुळे हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसणारे ‘रेड फ्लॅग’ कोणते आणि हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं लक्षात का येत नाहीत?

महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं अनेकदा फार तीव्र नसतात. त्यामुळे त्या लक्षणांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त असते. थकवा, ताणतणाव, वाढतं वय, मेनोपॉज किंवा रोजच्या धावपळीमुळे शरीर थकलं असेल असं समजून अनेक महिला ही लक्षणं दुर्लक्षित करतात.

काही वेळा ही लक्षणं गॅस, अॅसिडिटी, चिंता किंवा तणावाशी संबंधित असल्याचंही मानलं जातं. परिणामी डॉक्टरांकडे जाण्यास उशीर होतो. हार्ट अटॅकच्या वेळी उपचार मिळण्यास झालेला हा विलंब हृदयाच्या स्नायूंना अधिक नुकसान पोहोचवू शकतो आणि त्यातून बरे होण्यासही अधिक वेळ लागू शकतो.

महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढवणारे काही प्रमुख घटक म्हणजे -

  • उच्च रक्तदाब

  • लठ्ठपणा

  • मधुमेह

  • शारीरिक हालचालींचा अभाव

  • जास्त मीठ

  • प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं

  • नियंत्रणात नसलेला ताण

महिलांमध्ये दिसणारी लक्षणं इतर सामान्य समस्यांसारखी वाटू शकतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या नेमकी ओळखणं महत्त्वाचं आहे. हार्ट अटॅकचा धोका असल्यास योग्य तपासण्या करून तातडीने आणि योग्य उपचार मिळणं गरजेचं आहे.

हार्ट अटॅकचा सायलेंट इशारा

महिलांनी विशेष लक्ष द्यावं असं एक लक्षण म्हणजे अचानक किंवा कारण नसताना जाणवणारा असामान्य थकवा. नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवणं, रोजची साधी कामं करतानाही शरीरात ऊर्जा नसल्यासारखं वाटणं किंवा पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही थकवा कमी न होणं याकडे दुर्लक्ष करू नये.

हृदयाशी संबंधित समस्या असल्यास शरीरातील रक्तपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही आणि त्यातून सतत थकवा जाणवू शकतो. काही संशोधनांनुसार, असा थकवा हार्ट अटॅकच्या काही आठवडे आधीही जाणवू शकतो.

थकव्याशिवाय महिलांनी कोणती लक्षणं ओळखावीत?

हार्ट अटॅकच्या वेळी महिलांना खालीलपैकी काही लक्षणं जाणवू शकतात-

  • श्वास घेण्यास त्रास होणं

  • छातीत दडपण, जडपणा किंवा अस्वस्थ वाटणं

  • जबडा, मान, खांदा, पाठ किंवा हातामध्ये वेदना जाणवणं

  • चक्कर येणं

  • अचानक थंड घाम फुटणं

  • मळमळणं

  • झोपेच्या समस्या निर्माण होणं

ही सर्व लक्षणं प्रत्येक महिलेमध्ये दिसतीलच असं नाही. काही महिलांमध्ये छातीत तीव्र वेदना न होता इतर लक्षणं दिसू शकतात. महिलांना हार्ट अटॅकची लक्षणं ओळखायला उशीर होऊ शकतो. काही वेळा या लक्षणांना 'साइलेंट' लक्षणं समजलं जातं. उपचार मिळण्यास उशीर झाल्यास हृदयाला गंभीर नुकसान होण्याचा धोका वाढतो आणि रिकव्हरीलाही जास्त वेळ लागू शकतो.

Heart Attack in Women
Lung Cancer Stage 1: फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या स्टेज 1 मध्ये ही 5 लक्षणं दिसून येतात; शरीर देत असलेले संकेत वेळीच ओळखा

कोणत्या महिलांना हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो?

  • मधुमेह

  • उच्च रक्तदाब

  • वाढलेलं कोलेस्ट्रॉल

  • धूम्रपान

  • लठ्ठपणा

  • कुटुंबात हृदयरोगाचा इतिहास

  • मेनोपॉज

  • शारीरिक हालचालींचा अभाव

हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी महिलांनी काय करावं?

हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या जीवनशैलीत काही बदल करणं फायदेशीर ठरू शकतं.

  • हृदयासाठी संतुलित आहार घ्या

  • नियमित व्यायाम करा

  • धूम्रपान टाळा

  • कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवा

  • मधुमेह असल्यास तो नियंत्रणात ठेवा

  • पुरेशी आणि नियमित झोप घ्या

  • ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करा

  • वेळोवेळी आवश्यक आरोग्य तपासण्या करून घ्या

Heart Attack in Women
Heart failure symptoms: हार्ट फेल्युअर होण्याच्या काही तासांपूर्वी दिसतात हे 5 बदल, तिसरं लक्षण दिसताच डॉक्टरकडे धावा

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com