Lung Cancer Stage 1: फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या स्टेज 1 मध्ये ही 5 लक्षणं दिसून येतात; शरीर देत असलेले संकेत वेळीच ओळखा

Lung Cancer Symptoms: जागतिक फुफ्फुसाचा कॅन्सर दिनानिमित्त फुफ्फुसाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे, धोक्याची कारणे, धूम्रपानाचा परिणाम, कोणाला जास्त धोका असतो आणि वेळेत निदान का महत्त्वाचे आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
Lung Cancer Stage 1
Lung Cancer Stage 1saam tv
Published On

दरवर्षी १ ऑगस्ट रोजी जागतिक फुफ्फुसाचा कॅन्सर दिन (World Lung Cancer Day) मानला केला जातो. या दिवसाचा उद्देश फुफ्फुसाच्या कॅन्सरबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं हा आहे. हा कॅन्सर वेळेत ओळखला गेला नाही तर फुफ्फुसातील ट्यूमर हळूहळू वाढत जातो आणि पुढे जीवावरही बेतू शकतो. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात दिसणारी लक्षणं ओळखून तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिसणारी लक्षणं

थोडं चाललं किंवा काम केलं तरी दम लागणं

चालणं, जिने चढणं किंवा हलकं काम करतानाही श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. काही वेळा श्वसनमार्गात द्रव साचल्यामुळे असं होऊ शकतं.

Lung Cancer Stage 1
High Cholesterol: हाय कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतोय? डॉक्टरांनी सांगितलेल्या या 4 भाज्या नक्की खा!

छातीत, पाठीत, खांद्यात किंवा हाडांमध्ये वेदना

फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे छाती, पाठ आणि खांद्यामध्ये दुखू शकतं. कॅन्सर हाडांपर्यंत पसरल्यास हाडांमध्येही वेदना जाणवू लागतात.

सतत खोकला येणं

खोकला अनेक आठवडे कायम राहणं किंवा औषधं घेतल्यानंतरही बरा न होणं, हे फुफ्फुसाशी संबंधित गंभीर समस्येचं लक्षण असू शकतं. फुफ्फुस व्यवस्थित काम करत नसल्यामुळे अशी समस्या निर्माण होऊ शकते.

आवाजात बदल होणं

अचानक आवाज बसणे, आवाज जाड होणं किंवा सतत घरघर जाणवणं ही देखील महत्त्वाची लक्षणं आहेत. सर्दीमुळेही असं होऊ शकतं. मात्र हा त्रास अनेक आठवडे कायम राहिला तर डॉक्टरांकडे तपासणी करून घेणं आवश्यक आहे.

Lung Cancer Stage 1
Trump Tariff Impacts: ट्रम्प यांनी जनेरिक औषधांवर लावला २०० टक्के टॅरिफ, भारतातील कंपन्यांवर काय परिणाम होणार?

भूक कमी होणं

कोणतेही कारण नसताना भूक कमी होणं, वजन वेगाने कमी होणं आणि दिवसभर थकवा जाणवणं हीही फुफ्फुसाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं असू शकतात.

कोणाला फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका जास्त असतो?

धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका सर्वाधिक असतो.

स्वतः धूम्रपान करत नसले तरी इतरांच्या सिगारेट किंवा तंबाखूच्या धुराच्या सतत संपर्कात राहणाऱ्या व्यक्तींनाही हा धोका वाढतो.

रेडॉन, युरेनियम, डिझेलमधून निघणारे धूरकण, सिलिका, कोळशाशी संबंधित पदार्थ किंवा इतर विषारी रसायनांच्या संपर्कात वारंवार येणाऱ्या व्यक्तींमध्ये हा आजार होण्याची शक्यता अधिक असते.

कुटुंबातील एखाद्या सदस्याला यापूर्वी फुफ्फुसाचा कॅन्सर झाला असेल तर इतर सदस्यांमध्येही त्याचा धोका वाढू शकतो.

Lung Cancer Stage 1
Fatty Liver: लिव्हरवर फॅट्स जमा होऊन सूज आलीये? रोज प्या ही ३ ड्रिंक्स, काही दिवसातच वितळून जाईल चरबी

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com