Shukra Gochar 2023 : सिंह राशीत शुक्र ग्रहाचे गोचर ! या 3 राशींच्या नशीबाचे टाळे उघडणार,अचानक होईल धनलाभ

Shukra In Kundali : ७ जुलैनंतर शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल त्यामुळे या ३ राशींचा शुक्राचा प्रवेश शुभ ठरणार आहे.
Shukra Gochar 2023
Shukra Gochar 2023 Saam Tv
Published On: 

Shukra Che Rashi Parivartan : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळेनुसार आपली दिशा बदलत असतो. ग्रहांच्या संक्रमणामुळे सर्व राशींच्या जीवनावर चांगले व वाईट परिणाम होतात. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा धन, वैभव, प्रेम व कामुकता आणि ऐश्वर्याचा दाता मानला जातो.

सध्या शुक्र हा कर्क राशीत असून लवकरच तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे. ७ जुलैनंतर शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल त्यामुळे या ३ राशींचा शुक्राचा प्रवेश शुभ ठरणार आहे. अचानक धनलाभ (Money) होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या ३ राशींबद्दल.

Shukra Gochar 2023
Kemdrum Yog : कुंडलीत या दोषामुळे 3 राशींच्या आयुष्याला लागते ग्रहण, सतत भासते पैशांची चणचण

1. मिथुन:

मिथुन राशीसाठी हे संक्रमण अधिक फायदेशीर असणार आहे. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळेल. नवविवाहितांच्या (Marriage) संबंधित गोड बातमी असेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. बचत करण्यात यशस्वी व्हाल. नोकरीच्या नव्या संधी मिळतील.

2. तूळ:

शुक्र हा तूळ राशीचा स्वामी आहे आणि शुक्राचे संक्रमण तूळ राशीच्या राशीच्या लोकांना खूप शुभ परिणाम देईल. उत्पन्न भर होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांची प्रगती होईल. नवीन व्यवसाय (Business) सुरू करण्यासाठीही हा काळ उत्तम आहे. गुंतवणुकीतून लाभ होईल. तुमची बँक बॅलन्स वाढेल.

Shukra Gochar 2023
Surya Gochar 2023 : येत्या 3 दिवसांत या 4 राशींचे पालटणार भाग्य ! नोकरीत बढतीची शक्यता

3. कुंभ :

नवीन घर-कार इत्यादी खरेदी करू शकता. तुमचे भाग्य तुमच्यावर कृपा करेल. उत्पन्नात वाढ होऊ शकते. कामात यश मिळेल. व्यवसाय चांगला चालेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत झाल्यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. विवाहित लोकांच्या जीवनात आनंद राहील.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.