Kemdrum Yog : कुंडलीत या दोषामुळे 3 राशींच्या आयुष्याला लागते ग्रहण, सतत भासते पैशांची चणचण

Kemdrum Yog Effect : या योगामुळे माणसांच्या आयुष्यावर चांगले वाईट परिणाम दिसून येतात.
Kemdrum Yog
Kemdrum Yog Saam Tv
Published On: 

Kemdrum Yog In Kundali : आपल्या कुंडलीमध्ये असे अनेक प्रकारचे योग तयार होतात. त्यातील काही शुभ असतात तर काही अशुभ असतात. या योगामुळे माणसांच्या आयुष्यावर चांगले वाईट परिणाम दिसून येतात.

ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. असे म्हटले जाते की चंद्र शुभ स्थितीत नसेल तर व्यक्तीला मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. चंद्रापासून तीन प्रकारचे शुभ योग तयार होतात, सनफा, दुर्धारा आणि चंद्र अनफा, याशिवाय चंद्रापासून एक अशुभ योगही तयार होतो, त्याला केंद्रम योग म्हणतात. असे म्हणतात की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत (Kundali) केंद्रम योग असतो त्याला भाग्य कधीच साथ देत नाही. जन्मकुंडलीत असल्यामुळे अनेक शुभ योगांचा प्रभावही कमी होतो.

Kemdrum Yog
Surya Gochar 2023 : येत्या 3 दिवसांत या 4 राशींचे पालटणार भाग्य ! नोकरीत बढतीची शक्यता

1. केंद्रम योग कसा तयार होतो?

चंद्राच्या दोन्ही बाजूला कोणताही ग्रह नसताना केंद्रम योग तयार होतो. किंवा त्यावर कोणताही ग्रह दिसत नाही. केंद्रम योग झालेल्या व्यक्तीला अनेक समस्यांना (Problem) सामोरे जावे लागते.

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत केंद्रम योग तयार होतो त्याला मानसिक आजार (Mental Disease) होऊ शकतात. अशी व्यक्ती नेहमी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असते. नशीब त्याला कधीच साथ देत नाही. त्यामुळे त्याला जीवनात शारीरिक सुखही मिळत नाही. अनेक वेळा अशा व्यक्तीला यश न मिळाल्याने करिअर बदलावे लागते.

Kemdrum Yog
Neech Bhang Rajyog 2023 in Kark: येत्या २० दिवसात या ३ राशींवर पडेल पैशांचा पाऊस, प्रगतीच्या अनेक नव्या संधी मिळतील

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत केंद्रम योग तयार होतो, त्याला गरिबीचा सामना करावा लागतो. अशा व्यक्तीकडे पैसा टिकत नाही. त्याच्याकडे नेहमी पैशांची कमतरता असते. काही वेळा अशा व्यक्तीला काही असाध्य आजारालाही सामोरे जावे लागते. असे म्हटले जाते की कुंडलीमध्ये केंद्रम योग असल्यामुळे त्या व्यक्तीला आईचे सुख देखील प्राप्त होत नाही.

2. कोणत्या राशीत केंद्रम योग येतो ?

मीन, वृश्चिक आणि कर्क राशींसाठी केंद्रम योग सर्वात वाईट आहे. या राशीच्या लोकांच्या कुंडलीत केंद्रम योग असल्यास जीवन अधिक कष्टदायक असते.

Kemdrum Yog
Budh Gochar 2023 : बुध गोचरमुळे जुळून येतोय गजकेसरी योग ! या 6 राशीचे खुलणार भाग्य, नोकरीत बढतीची शक्यता

3. केंद्रम योगाचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाय

  • कुंडलीत केंद्रम योग असल्यास त्या व्यक्तीने प्रत्येक सोमवारी शिवलिंगाला जल अर्पण करावे. त्यामुळे त्याचा प्रभाव कमी होतो.

  • केंद्रम योगाचा प्रभाव कमी करण्यासाठी व्यक्तीने रोज सकाळी आईच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करावा.

  • कुंडलीत केंद्रम योग असल्यास त्या व्यक्तीने दर सोमवारी तांदूळ, दूध किंवा साखरेचे दान करावे.

  • कुंडलीत केंद्रम योग असल्यास त्या व्यक्तीने दररोज "ओम श्रीं श्रम सह चंद्रमसे नमः" हा जप करावा.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.