Y Chromosome: पुरुषांच्या Y गुणसूत्रात झपाट्यानं घट, पृथ्वीवरून पुरुष नष्ट होणार?

Y Chromosome: जर जगातून सर्व पुरुष नामशेष झाले आणि फक्त महिलाच राहिल्या तर काय होईल? याची कल्पनाच करवत नाही. हो पण भविष्यात असं होईल अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय. हे नेमकं कशामुळे होणार आहे? कधी पुरूष नष्ट होणार आहे? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Y Chromosome: पुरुषांच्या Y गुणसूत्रात झपाट्यानं घट, पृथ्वीवरून पुरुष नष्ट होणार?
Y Chromosome
Published On

स्त्री आणि पुरुष दोघेही मानवी जीवनाचा आधार आहेत. जर यापैकी एकाचंही अस्तित्व धोक्यात आलं तर जीवनचक्र पुढे जाणे केवळ अशक्य. मात्र याच सूत्राला आता सुरूंग लागण्याची शक्यता आहे. कारण जगातून सर्व पुरुष नामशेष होणार असल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवलीय. शास्त्रज्ञांच्या मते, पुरुषांच्या जन्मासाठी आवश्यक असलेले Y क्रोमोझोम झपाट्याने कमी होत आहेत आणि याचा असाच वेग कायम राहिला तर एक दिवस पुरूष पृथ्वीवरून पूर्णपणे नाहीसे होतील.

महिलांच्या शरीरात दोन X गुणसूत्र असतात, तर पुरुषांच्या शरीरात एक X आणि एक Y गुणसूत्र असते. जेव्हा स्त्री आणि पुरुषाचे XX गुणसूत्र एकत्र येतात तेव्हा स्त्री गर्भ बनतो आणि जेव्हा XY गुणसूत्र एकत्र येतात तेव्हा पुरुष गर्भ निर्माण होतो. Y क्रोमोझोम हे पुरुषाचं प्रतीक मानलं जातं आणि पुरुषांच्या जगण्यासाठी ते खूप महत्वाचे आहे. जर पुरुषांचे Y गुणसूत्र नष्ट झाले तर जगात मुलगा जन्माला येणं थांबेल आणि फक्त मुलीच जन्माला येतील.

आत्तापर्यंत अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की Y गुणसूत्र झपाट्याने नाहीसे होत आहे. महिलांचे X गुणसूत्र पूर्णपणे सामान्य असते, परंतु पुरुषांचे X गुणसूत्र ठीक असलं तरी Y गुणसूत्र हळूहळू नष्ट होत आहे. घसरणीचा हा वेग असाच सुरू राहिला तर येत्या ४६ लाख वर्षांत Y गुणसूत्र पूर्णपणे नष्ट होईल. असे झाले तर पुरुषांचे अस्तित्वही संपुष्टात येईल. आता तुम्हाला वाटत असेल की 46 लाख वर्षे हा खूप मोठा कालावधी आहे. मात्र पृथ्वीवर अजून 350 कोटी वर्षांचं जीवन शिल्लक आहे. त्या तुलनेत ४६ लाख वर्षे हा फार कमी काळ आहे.

त्यामुळे तीनशे वर्ष जीवन बाकी असताना पुरूषांचं अस्तित्व संपुष्टात आलं तर मोठा अनर्थ होईल. मात्र याबाबत अनेक शास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. संशोधनातून कालांतराने चित्र स्पष्ट होईल अशी आशा आहे. जपानमधील संशोधकांना असे आढळून आले की उंदरांमधील बहुतेक Y गुणसूत्र जीन्स इतर गुणसूत्रांमध्ये हस्तांतरित केली गेली आहेत. हा शोध सूचित करतो की Y गुणसूत्राचं अस्तित्व नष्ट झाल्यास लिंग निर्धारणासाठी नवीन यंत्रणा विकसित होऊ शकते.

हा शोध मानवजातीच्या भविष्यासाठी महत्त्वाचा आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की 11 दशलक्ष वर्षांत कोणी पृथ्वीवर आला तर त्याला मानव सापडणार नाही, परंतु तोपर्यंत मानवजात सुरक्षित आहे. असं असलं तरी यावर अधिक संशोधन होणं गरजेचं आहे.

Y Chromosome: पुरुषांच्या Y गुणसूत्रात झपाट्यानं घट, पृथ्वीवरून पुरुष नष्ट होणार?
Red Banana Benefits: हिरवी-पिवळी केळी सोडा आणि लाल केळी खा; आरोग्याला मिळतील भरपूर फायदे!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com