Red Banana Benefits: हिरवी-पिवळी केळी सोडा आणि लाल केळी खा; आरोग्याला मिळतील भरपूर फायदे!

Red Banana Benefits: तुम्ही लाल रंगाची खेळी खाल्ली आहेत का? असं म्हटलं जातं की, ही केळी लाल आणि पिवळ्या केळ्यांपेक्षाही अधिक पौष्टिक असतात.
Red Banana Benefits
Red Banana Benefitsgoogle
Published On

आरोग्यासाठी स्वस्तात मस्त फळ म्हणजे केळी. केळ्यामध्ये असे काही घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. आतापर्यंत तुम्ही हिरवी आणि पिवळी केळी खाल्ली असतील. मात्र तुम्ही लाल रंगाची खेळी खाल्ली आहेत का? आता हे तुम्हाला ऐकून थोडं वेगळं वाटेल, मात्र हो आता बाजारात लाल रंगाची केळी देखील तुम्हाला दिसू शकतात.

मात्र भारतीय बाजारात ही केळी उपलब्ध नाही. मात्र ऑस्‍ट्रेल‍िया, वेस्ट इंडीज, मेक्सिको आणि अमेरिकाकेमध्ये ही केळी पहायला मिळतात. असं म्हटलं जातं की, ही केळी लाल आणि पिवळ्या केळ्यांपेक्षाही अधिक पौष्टिक असतात.

काय आहेत लाल केळ्यांचे फायदे

पुरुषांची फर्टिलीटी पॉवर वाढते

लाल केळ्यामध्ये बीटा-कॅरटीन आणि व्हिटॅमिन सी यांचं प्रमाण अधिक असतं. यामुळे प्रजनन क्षमता, शक्ती वाढवण्यास मदत होते. याशिवाय त्यामध्ये झिंकचं प्रमाण देखील जास्त असतं. पुरुषांमध्ये फर्टिलीटीचं प्रमाण वाढवतं. याशिवाय टेस्टोस्टेरॉन हार्मोन देखील नियंत्रित करते.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम

या केळ्यांमध्ये ल्यूटीन और बीटा-कॅरटेनॉयड्सचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे डोळ्यांच्या समस्यांसाठी ही केळी फायदेशीर मानली जातात.

Red Banana Benefits
Belly Fat : आता व्यायाम न करताही पोटाचा घेर कमी करणं सोपं; फक्त या ट्रीक्स करा फॉलो

त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर

लाल केळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि कॅरोटीनॉइड असतात. हे घटक तुमचं तारूण्य टिकून ठेवण्यास मदत करतात. याशिवाय व्हिटॅमिन सी कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देतं. त्यामुळे त्वचा आणि केस दोन्ही सुंदर होतात. ज्या व्यक्तींचे केस गळतात, त्यांना ही केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. कोलेजनमुळे त्वचेत तुळतुळी आणि मऊ राहते. तसंच चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात.

रक्त साफ होण्यास मदत

लाल केळ्यांचा रक्त शुद्ध करण्यास देखील फायदा होतो. या केळ्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वं आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे हिमोग्लोबिन आणि लोहाची पातळी वाढवण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे लाल रक्तपेशी तयार करण्यात मदत होणारे घटक या केळ्यामध्ये आहेत.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

Red Banana Benefits
Vitamin deficiency : कोणत्या व्हिटॅमीनच्या कमतरतेने जास्त झोप येते? वेळीच लक्ष द्या अन्यथा...!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com