आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि अयोग्य आहारामुळे लठ्ठपणा वाढण्याची समस्या अनेकांमध्ये दिसून येते. सतत बैठ्या पद्धतीचं काम आणि चुकीच्या पद्धतीने घेत असलेला आहार यामुळे वजन वाढतं. वजन वाढलं की, डाएट ( Diet ) आणि जीम यांच्यावर भर देऊन ते कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र आज आम्ही तुम्हाला व्यायाम न करता बेली फॅट म्हणजेच पोटावरील चरबी कमी कशी करू शकता याबाबत माहिती देणार आहोत.
व्यायामाशिवाय पोटाची चरबी कमी करणं हे प्रत्येकासाठी हे एक मोठं आव्हान असतं.तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमच्या शरीराची हालचाल होते. अशावेळी शारीरिक हालचाली कॅलरी बर्न होते आणि वजन कमी होतं. मात्र काहींना कामामुळे जीम किंवा वर्कआऊट करणं जमत नाही. यावेळी व्यायामाशिवाय कसं वजन कमी करता येईल हे पाहूयात.
सध्याच्या जीवनशैलीमध्ये प्रत्येकामध्ये ताणाचं प्रमाण अधिक असतं. जास्त ताण हे वजन आणि पोटावरील चरबी वाढण्याचं मुख्य कारण ठरतं. ताण कमी करण्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंट करणं गरजेचं असून आपण या गोष्टीवर भर दिला पाहिजे.
पुरेशी झोप घेणं हे निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असून पुरेशी आणि चांगली झोप मिळेल याची प्रत्येकाने खात्री केली पाहिजे. झोपेच्या कमतरतेमुळे हार्मोनच्या पातळीत फरक पडतो आणि परिणामी वजन वाढू शकतं. त्यामुळे झोप घेतली पाहिजे.
आपल्यासाठी आहार खूप महत्त्वाचा आहे. संतुलित आणि पौष्टिक आहार घेणं आवश्यक आहे. जर तुम्हाला जीमशिवाय वजन कमी करायचंय तर असेल तुमच्या आहारात भरपूर फळं, भाज्या, संपूर्ण धान्य, प्रोटीन यांचा समावेश करावा लागेल.
तुम्हाला माहितीये का वजन कमी करण्यासाठी पाणी पिणं भरपूर फायदेशीर ठरतं. पाणी तुमच्या शरीरात चयापचय वाढवण्यास मदत करतं. ज्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होते.
अवेळी जेवणं ही सवय फार चुकीची असून यामुळे वजन वाढण्याची समस्या सुरु होते. अशावेळी रात्री उशिरा खाणं टाळलं पाहिजे. रात्रीच्या वेळेस जास्त जेवण किंवा जंक फूड खाणं
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.