Paris Olympics 2024: ऐकावं ते नवलच! पठ्ठ्याने महिला अन् पुरुष कॅटेगरीत जिंकलं ऑलिम्पिक मेडल

Henry Fieldmen Won Medal In Both Cetegory: या पठ्ठ्याने महिला आणि पुरुष कॅटेगरीत ऑलिम्पिक पदक जिंकलं आहे. नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या.
Paris Olympics 2024: ऐकावं ते नवलच! पठ्ठ्याने महिला अन् पुरुष कॅटेगरीत जिंकलं ऑलिम्पिक मेडल
henry fieldmeninstagram
Published On

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत. मात्र एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत एका पुरुषाने महिला आणि पुरुषांच्या इव्हेंटमध्ये पदक जिंकल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? क्वचितच ऐकलं असेल. मात्र हे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत घडलंय. हा कारनामा केलाय ब्रिटनचा अॅथलिट हेनरी फिल्डमॅनने. तो ऑलिम्पिक स्पर्धेत महिला आणि पुरुषांच्या इव्हेंटमध्ये पदक जिंकणारा जगातील पहिलाच अॅथलिट ठरला आहे. हे कसं शक्य झालं? जाणून घ्या.

ग्रेट बिटनचा अॅथलिट हेनरी फिल्डमनने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत खेळताना महिलांच्या रोइंग इव्हेंटमध्ये रौप्यपदकाला गवसणी घातली आहे. यापूर्वी २०२० मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पुरुषांच्या रोइंग इव्हेंटमध्ये त्याने कांस्यपदकाला गवसणी घातली होती.

Paris Olympics 2024: ऐकावं ते नवलच! पठ्ठ्याने महिला अन् पुरुष कॅटेगरीत जिंकलं ऑलिम्पिक मेडल
IND vs SL, 2nd ODI: टीम इंडियाने सामना कुठे गमावला? कोचने सांगितलं नेमकं कारण

हे कसं शक्य आहे?

इतर खेळांमध्ये हे कठीण आहे. मात्र रोइंगमध्ये हे शक्य आहे. या खेळातील नियमच असे आहेत की, हेनरी महिलांच्या संघातून खेळू शकला. तर झाले असे की, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत हेनरी ग्रेट ब्रिटेनकडून कॉक्सवेनची भूमिका बजावली. कॉक्सवेन म्हणजे,जो संपूर्ण संघाला लीड करतो. २०१७ मध्ये रोइंगमध्ये नवा नियम लागू करण्यात आला होता. या नियमानुसार, रोइंगच्या महिला आणि पुरुषांच्या कॅटेगरीमध्ये कॉक्सवेनसाठी कुठलीही अट नाही. पुरुष आणि महिला संघांचा कॉक्सवेन पुरष किंवा महिला कोणीही असू शकतो. त्यामुळे हेनरीने महिलांच्या कॉक्सवेनची भूमिका पार पाडली आणि महिला संघाला रौप्यपदक जिंकून देण्यात मदत केली.

Paris Olympics 2024: ऐकावं ते नवलच! पठ्ठ्याने महिला अन् पुरुष कॅटेगरीत जिंकलं ऑलिम्पिक मेडल
IND vs SL 2nd ODI: हातचा सामना कोणामुळे निसटला? हे आहेत भारताच्या पराभवाचे ४ व्हिलन

रोइंग इव्हेंटमध्ये ८ खेळाडूंचा कॉक्सवेन महिला किंवा पुरुष कोणीही असू शकतो. पॅरिस ऑलम्पिक २०२४ स्पर्धेत हेनरीने ग्रेट ब्रिटनच्या महिला संघासाठी कॉक्सवेनची भूमिका पार पाडली. यासह तो ऑलिम्पिक स्पर्धेत महिला आणि पुरुषांच्या कॅटेगरीत पदक जिंकणारा पहिलाच खेळाडू ठरला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com