नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज १० व्या दिवशी भारताची नजर कांस्यपदकावर असणार आहे. भारताने आतापर्यंत तीन कांस्यपदक जिंकले आहेत. तिन्ही कांस्यपदक नेमबाजीतून मिळाले आहेत. त्यानंतर आता सर्वांचं लक्ष हे सेनवर असणार आहे. सर्व भारतीयांना सेनला कांस्यपदक मिळावं, अशी आशा आहे.
लक्ष्य सेनचा आज कांस्यपदकासाठी मलेशियासोबत सामना होणार आहे. लक्ष्यने हा सामना जिंकल्यास कांस्यपदकाचा मानकरी ठरणार आहे. तसेच आज स्कीट मिक्स टीमचाही सामना होणार आहे. तसेच भारतीय खेळाडूंची कुस्तीच्या सामन्यांमध्ये एन्ट्री होणार आहे. तर टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रा अॅक्शनमध्ये असणार आहे.
नेमबाजी : महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंह नरुका , दुपारी १२.३० वाजता
टेबल टेनिस : महिला टीम (प्री क्वार्टर फायनल) : भारत विरुद्ध रोमानिया, दुपारी १.३० वाजता
नौकायन : महिला डिंगी (ओपनिंग सीरीज ) शर्यत ९- दुपारी ३.४५ वाजता
एथलॅटिक्स : महिला ४०० मीटर : किरण पहल (हीट पाच) - दुपारी ३.५७ वाजता
नौकायन : महिला डिंगी (ओपनिंग सीरीज) शर्यत १० - सायंकाळी ४.५३ वाजता
बॅडमिंटन : पुरुष एकेरी (कांस्यपदक प्लेऑफ ) : लक्ष्य सेन विरुद्ध ली जी जिया (मलेशिया) सांयकाळी ६ वाजता
नौकायन - पुरुष डिंगी (ओपनिंग सीरीज ) शर्यत ९ - सांयकाळी ६.१० वाजता
कुस्ती - महिला फ्रीस्टाइल ६८ किलो वजन गट, १/८ राऊंड : निशा विरुद्ध यूक्रेनची तेतियाना सोवा रिझको - सायंकाळी ६.३० वाजता
नेमबाजी - स्कीट पात्रता मेडल सामना : महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंह नरुका - सायंकाळी ६.३० वाजता
नौकायन : पुरुष डिंगो (ओपनिंग सीरीज ) - शर्यत १० - सांयकाळी ७.१५ वाजता
कुस्ती : महिला फ्रीस्टाइल ६८ किलो ग्रॅम व्वार्टर फायन (पात्र झाल्यास) निशा - ७.५० वाजता
एथलॅटिक्स : पुरुष ३००० मीटर स्टीपलचेज : अविनाश साबळे - रात्री १०.५० वाजता
कुस्ती : महिला फ्रीस्टाइल ६८ किलोग्रॅम (पात्र झाल्यास) : निशा - रात्री १.१० वाजता
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.