Paris Olympic : मनु भाकरचा सुवर्णवेध थोडक्यात हुकला, २८ गुणांसह चौथ्या स्थानी

Manu Bhaker Paris Olympic : भारताची नेमबाज मनू भाकर हिची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिसरं पदक पटकवण्याची संधी थोडक्यात हुकली.
Manu Bhaker
manu bhakertwitter
Published On

Manu Bhaker Paris Olympic : भारताची नेमबाज मनू भाकर हिची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिसरं पदक पटकवण्याची संधी थोडक्यात हुकली. सुरुवातीला मनु भाकर(Shooter Manu Bhaker) हिनं जोरदार कामगिरी करत पदकाची आशा उंचावली होती. पण अखेरच्या टप्प्यात मनु भाकर हिला अचूक वेध घेता आला नाही. मनु भाकर (Shooter Manu Bhaker) २८ गुणांसह चौथ्या क्रमांकवर राहिली. कोरियाच्या २१ वर्षीय खेळाडूने सुवर्णपदकावर नाव कोरले.

मनु भाकरचं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) तिसरं पदक थोडक्यात हुकलं. पण तिने दोन पदकं जिंकून भारताची मान उंचावली आहे. मनु भाकर(Shooter Manu Bhaker) हिने याआधी दोन कांस्य पदकावर नाव कोरले होते. मनुने १० मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्यपदकावर नाव कोरले होते.

मनू भाकरने २५ मीटर पिस्तुल एकेरीमध्ये दुसरे स्थान मिळवून अंतिम फेरी गाठली होती. मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत दोन पदके जिंकली आहेत. मनू भाकरला अंतिम फेरीत शूटऑफमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. अंतिम 8 मध्ये मनू भाकर 28 गुणांसह चौथ्या स्थानावर राहिली.

मनु भाकरची सुरुवात निराशाजनक झाली होती. पहिल्या फेरीमध्ये मनू भाकर हिने 10.2 च्यावर 5 पैकी 2 शॉट मारले आणि 2 गुण मिळवले. दुसऱ्या फेरीत तिने 5 पैकी 4 शॉट्स अचूक मारत चौथा क्रमांक पटकावला. तिसऱ्या फेरीतही मनूने 10.2 च्या वर 4 शॉट्स मारत चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. सहाव्या फेरती तिने 5 पैकी 4 शॉट्स अचूक मारत दुसरे स्थान गाठले. पण अखेरच्या दोन फेरीमध्ये तिला अचूक वेध घेण्यात यश आले नाही. त्यामुळे मनू भाकरची पदकांची हॅट्ट्रिक हुकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com