Paris Olympics 2024, Tennis Final: नोवाक जोकोविचने रचला इतिहास! पहिल्यांदाच ऑलिम्पिक पदकावर कोरलं नाव

Novak Djokovic vs Carlos Alcaraz, Paris Olympics 2024 Final Result: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये नोवाक जोकोविच आणि कार्लोस अल्काराज हे दोन्ही खेळाडू आमनेसामने आले होते.
Paris Olympics 2024, Tennis Final: 
नोवाक जोकोविचने रचला इतिहास! पहिल्यांदाच ऑलिम्पिक पदकावर कोरलं नाव
novak djokovictwitter
Published On

सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचने आपल्या कारकिर्दीत सर्वकाही जिंकलं. मात्र एक गोष्ट होती जी त्याला आपल्या संपूर्ण कारकिर्दीत जिंकता आली नव्हती. ती म्हणजे ऑलिम्पिक गोल्ड मेडल. यापूर्वी त्याने आपल्या कारकिर्दीत कधीच ऑलिम्पिक मेडल जिंकलं नव्हतं. मात्र पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये त्याने कार्लोस अल्काराझला पराभूत करत पहिल्यांदाच गोल्ड मेडल जिंकलं आहे. यासह तो ऑलिम्पिक स्पर्धेत टेनिसमध्ये मेडल जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.

नोवाक जोकोविचने या स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये लोरेन्झो मुसेट्टीचा पराभव करत फायनलचं तिकीट मिळवलं. जोकोविचने लोरेन्झो मुसेट्टीचा ६-४, ६-२ असा पराभव केला होता. तर कार्लोस अल्काराझने कॅनडाच्या फेलिक्स ऑगर आलियासिमचा ६-१,६-१ ने पराभव केला होता.

Paris Olympics 2024, Tennis Final: 
नोवाक जोकोविचने रचला इतिहास! पहिल्यांदाच ऑलिम्पिक पदकावर कोरलं नाव
IND vs SL 2nd ODI: वेलालागेने श्रीलंकेची लाज राखली! टीम इंडियाला जिंकण्यासाठी 241 धावांचं आव्हान

हे दोन्ही खेळाडू आपला ऑलिम्पिकचा पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. हा सामना जोकोविचसाठी अतिशय महत्वाचा होता,कारण ४ ऑलिम्पिक स्पर्धेत त्याला एकदाही गोल्ड मेडल जिंकता आलं नव्हतं. त्यामुळे त्याने हा सामना जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावला. त्याने विम्बल्डन स्पर्धेतील फायनलच्या पराभवाचा बदला घेत कार्लोसला ७-६, ६-२ ने धुळ चारली. यासह १९८८ नंतर तो ऑलिम्पिक टेनिस स्पर्धेत पदक जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.

Paris Olympics 2024, Tennis Final: 
नोवाक जोकोविचने रचला इतिहास! पहिल्यांदाच ऑलिम्पिक पदकावर कोरलं नाव
Rohit Sharma Viral Video: लाइव्ह सामन्यात रोहित, वॉशिंग्टन सुंदरला मारायला धावला? नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

आपल्या कारकिर्दीत २४ ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या जोकोविचला एकदाही ऑलिम्पिक मेडल जिंकता आलं नव्हतं. गेल्या ३ ऑलिम्पिक स्पर्धेतील रेकॉर्ड पाहिला,तर त्याला सेमिफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. २००८ मध्ये झालेल्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने कांस्यपदकावर नाव कोरलं होतं. त्यानंतर २०१२ लंडन ऑलिम्पिक, २०२१ मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत त्याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com