IND vs SL 2nd ODI: हातचा सामना कोणामुळे निसटला? हे आहेत भारताच्या पराभवाचे ४ व्हिलन

Reason Behind Team Indias' Defeat: भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यात ३२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.
IND vs SL 2nd ODI:  हातचा सामना कोणामुळे निसटला? हे आहेत भारताच्या  पराभवाचे ४ व्हिलन
team indiatwitter
Published On

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा वनडे सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. २४१ धावांचा बचाव करताना श्रीलंकेने ३२ धावांनी विजय मिळवला आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २४१ धावा करायच्या होत्या. मात्र भारतीय संघाचा डाव २०८ धावांवर आटोपला. दरम्यान कोण आहे भारतीय संघाच्या पराभवाला कारणीभूत? जाणून घ्या.

IND vs SL 2nd ODI:  हातचा सामना कोणामुळे निसटला? हे आहेत भारताच्या  पराभवाचे ४ व्हिलन
IND vs SL, 2nd ODI: टीम इंडियाने सामना कुठे गमावला? कोचने सांगितलं नेमकं कारण

विराट कोहली -

या सामन्यातही रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी मिळून ९७ धावा जोडल्या. इथून लक्ष्य खूप जवळ होतं. त्यावेळी विराट कोहली फलंदाजीला आला. त्याला डाव पुढे घेऊन जायचा होता. मात्र या सामन्यातही तो स्वस्तात माघारी परतला. विराट कोहली १४ धावांवर माघारी परतला. विराट बाद झाल्यानंतर भारतीय संघाची धावसंख्या ३ गडी बाद ११६ इतकी होती. यापूर्वी झालेल्या पहिल्या वनडेतही तो स्वस्तात माघारी परतला होता. त्याला अवघ्या २४ धावा करता आल्या होत्या.

श्रेयस अय्यर -

तब्बल १० महिने संघातून बाहेर राहिल्यानंतर श्रेयस अय्यरला भारतीय संघात कमबॅक करण्याची संधी मिळाली. मात्र सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये तो सुपरफ्लॉप ठरला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना तो २३ धावा करत माघारी परतला होता. तर या सामन्यात त्याला अवघ्या ७ धावा करता आल्या.

IND vs SL 2nd ODI:  हातचा सामना कोणामुळे निसटला? हे आहेत भारताच्या  पराभवाचे ४ व्हिलन
IND vs SL,2nd ODI: टीम इंडियाची स्थिती 'गंभीर'; जेफ्री वँडर्सेचा विकेट्सचा षटकार, भारताचा दारुण पराभव

केएल राहुल -

केएल राहुलने गेल्या सामन्यात महत्वपूर्ण खेळी केली होती. त्याने अक्षर पटेलसोबत महत्वपूर्ण भागीदारी केली होती. या भगिदरीच्या बळावर त्याने भारतीय संघाला विजयाच्या अगदी जवळ पोहोचवलं होतं. मात्र या सामन्यात तो शून्यावर माघारी परतला.

शिवम दुबे -

शिवम दुबेने गेल्या सामन्यात २४ चेंडूत २५ धावा केल्या होत्या. भारतीय संघाचा विजय समोर असताना तो बाद झाला होता. १४ चेंडूत भारताला १ धाव करता आली नव्हती. त्यामुळे हा सामना बरोबरीत संपला होता. दरम्यान या सामन्यात तर तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com