Ram Navami 2026: रामनवमी कधी आहे? या सणाला करा स्पेशल थाळी, एका क्लिकवर वाचा संपूर्ण मेन्यू

Ram Navami Menu: रामनवमी 2026 मध्ये 26 मार्च रोजी साजरी होणार असून पूजा मुहूर्त, उपवास नियम आणि पारंपरिक प्रसाद याबाबत जाणून घ्या. भक्तिभावाने सण साजरा करण्याचे मार्ग येथे दिले आहेत.
Ram Navami fasting rules
Ram Navami 2026 date and timegoogle
Published On

हिंदू धर्मात रामनवमी मोठ्या थाटात साजरी केली जाते. या दिवशी प्रभू राम यांचा जन्मदिवस असतो. हा दिवस चैत्र नवरात्रीच्या नवव्या म्हणजेच शेवटच्या दिवशी साजरा केला जातो. पुढील माहितीत आपण या दिवसाचे शुभ मुहूर्त तारिख आणि या दिवशी कोणते पारंपारिक पदार्थ बनवले जातात? याबद्दल जाणून घेणार आहोत.

यंदा चंद्राच्या तिथीमुळे रामनवमीच्या तारखेबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. २०२६ साली रामनवमी २६ मार्च, गुरुवारी साजरी केली जाणार आहे. चैत्र शुक्ल नवमी तिथी २६ मार्च रोजी सकाळी ११:४६ वाजता सुरू होईल. उदय तिथीनुसार ही तिथी २७ मार्चपर्यंत राहणार असल्यामुळे त्या दिवशीही पूजा-अर्चा केली जाऊ शकते. रामनवमीच्या दिवशी मध्यान्ह मुहूर्ताला विशेष महत्त्व असते. २६ मार्च रोजी सकाळी ११:१५ ते दुपारी १:४३ या वेळेत पूजेसाठी शुभ मुहूर्त आहे, तर मध्यान्ह क्षण दुपारी १२:२९ वाजता आहे. २७ मार्च रोजीही जवळपास त्याच वेळेत पूजेसाठी शुभ कालावधी उपलब्ध आहे.

Ram Navami fasting rules
Argan Oil Eyebrows: पातळ आयब्रोचा त्रास संपला! आर्गन ऑईलच्या या 3 पद्धतींनी होतील घनदाट आणि काळ्या भुवया

रामनवमीला अनेक भक्त उपवास पाळतात. काहीजण दुपारपर्यंत उपवास करतात, तर काहीजण दिवसातून एकदाच भोजन करतात. उपवासादरम्यान फळं, दूध, दही यांसारखे हलके पदार्थ खाल्ले जातात. तसेच कांदा-लसूण आणि तिखट मसाले टाळून सैंधव मिठाचा वापर केला जातो. चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असल्याने अनेक घरांमध्ये कंजक पूजा किंवा कन्या पूजन केले जाते.

रामनवमीच्या निमित्ताने पारंपरिक पदार्थांनाही विशेष महत्त्व असते. उकडलेले काळे चणे, रव्याचा हलवा, पुरी, खीर आणि दही भल्ला यांसारखे पदार्थ प्रसाद म्हणून तयार केले जातात आणि भगवान रामाला अर्पण केले जातात. हे पदार्थ साधेपणाने बनवले जातात आणि भक्तिभावाने सादर केले जातात.

रामनवमी हा सण भक्ती, श्रद्धा आणि साधेपणाचा संदेश देणारा आहे. विधीपूर्वक पूजा आणि पारंपरिक परंपरांचे पालन करून भक्तगण प्रभू रामाचा जन्म मोठ्या आदराने आणि आनंदाने साजरा करतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Ram Navami fasting rules
Post Office Schemes: पोस्ट ऑफिसच्या या ५ धांसू स्कीममध्ये करा गुंतवणूक, मिळणार हाय रिटर्न

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com