Post Office Schemes: पोस्ट ऑफिसच्या या ५ धांसू स्कीममध्ये करा गुंतवणूक, मिळणार हाय रिटर्न

Sakshi Sunil Jadhav

गुंतवणुकीचा पर्याय

आयुष्यात पैसा खूप महत्वाचा असतो. ज्याला स्वत:ची स्वप्न, फॅमिलीची आजारपणं, घरासाठी किंवा भविष्यासाठी पेन्शन हवी असेल तर अनेकजण गुंतवणुकीचा पर्याय निवडतात. पुढील योजनांमध्ये तुम्हाला ७ ते ८ टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा मिळू शकतो.

best post office investment

पहिली योजना

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) ही योजना महिलांसाठी खूप सोयीची ठरते. यामध्ये तुम्हाला दोन वर्षांच्या कालावधीमध्ये फक्त १००० रुपयांमध्ये खातं उघडता येतं.

best post office investment

मिळणारा परतावा

तुम्ही या योजनेत जास्त २ लाखपर्यंतची गुंतवणूक करु शकता. खातं उघडल्यानंतर १ वर्षानंतर ठेवीच्या ४०% रक्कम काढण्याची सोय तुम्हाला यामध्ये मिळते. काही अटींच्या अधीन राहून, सहा महिन्यांनंतर खाते बंद सुद्धा करता येतं.

MSSC scheme details

दुसरी योजना

सुकन्या समृद्धी योजनेत तुमच्या मुलींसाठी गुंतवणुक करता येते. मुलींचे वय १० वर्षांखाली असायला हवं. यामध्ये तुम्हाला ८.२ टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकतं.

monthly income schemes India

तिसरी योजना

सार्वजनिक भविष्य निधी (पीपीएफ) योजनेत तुम्हाला ७.१ टक्क्यांपर्यंत व्याज मिळतं. यामध्ये तुम्ही फक्त ५०० रुपयांपर्यंत गुंतवणुक करू शकता.

monthly income schemes India

एकूण कालावधी

तुम्हाला या योजनेत १५ वर्षे गुंतवणूक करता येते. मुदतपूर्तीनंतर, रक्कम आणखी ५ वर्षांसाठी वाढवता येते. मुदतपूर्तीची रक्कम देखील पूर्णपणे करमुक्त असते.

tax free investment India

चौथी योजना

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत (POMIS)एकरकमी गुंतवणूक केल्यानंतर पुढच्याच महिन्यापासून व्याज मिळण्यास सुरुवात होते. यामध्ये ७.४ वार्षिक व्याज मिळतं.

tax free investment India

पाचवी योजना

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये (SCSS) सेवानिवृत्तीनंतरचा आर्थिक ताण कमी करता येतो. यामध्ये पोस्ट ऑफिस ८.२ टक्केपर्यंत व्याज देते. तुम्हाला यामध्ये १,००० रुपयांपासून गुंतवणुक सुरू करता येते. त्यामध्ये एका खात्यासाठी १५ लाखांची मर्यादा असते.

tax free investment India

NEXT: पातळ आयब्रोचा त्रास संपला! आर्गन ऑईलच्या या 3 पद्धतींनी होतील घनदाट आणि काळ्या भुवया

thick eyebrows naturally
येथे क्लिक करा