PCOS Awareness Month 2023
PCOS Awareness Month 2023Saam Tv

PCOS Awareness Month 2023 : महिलांची मासिक पाळी का चुकते? समस्या की, आजार? या लक्षणांवरुन ओळखा

Polycystic Ovary Syndrome Awareness Month : दरवर्षी सप्टेंबर महिना PCOS जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो.

PCOS Symptoms :

हल्ली PCOS च्या समस्यांनी बहुतांश तरुणवर्ग त्रस्त आहेत. वय वाढण्यापूर्वीच या आजारांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत या समस्येबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी सप्टेंबर महिना PCOS जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो.

या आजारांचे योग्य वेळी निदान होणे आणि महिलांनी याबाबत जागृक राहाणे अधिक गरजेचे आहे. परंतु आपल्याला पीसीओएसचा आजार झाला आहे हे कसे ओळखायचे जाणून घेऊया त्याबद्दल

PCOS Awareness Month 2023
PCOS Disease : मासिक पाळी वेळेवर येत नाही? पीसीओएसचा त्रास सतावतो? डाएटमध्ये सामील करा हे पदार्थ

1. PCOS म्हणजे काय?

जॉन्स हॉपकिन्स मेडिसिनच्या मते, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) ही आरोग्याची समस्या आहे. ज्यामध्ये अंडाशय हे सामान्यपेक्षा जास्त एन्ड्रोजन आणि पुरुष लैंगिक हार्मोन्स तयार करतात. ज्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये (Women) कमी प्रमाणात आढळते. तसेच पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोम म्हणजे अंडाशयात अनेक लहान सिस्ट तयार होणे. PCOS असलेल्या काही स्त्रियांना सिस्ट विकसित होत नाही, तर PCOS नसलेल्या काही स्त्रियांना सिस्ट विकसित होतात.

2. PCOS ची लक्षणे कोणती?

1. अनियमित मासिक पाळी (Periods)

PCOS च्या समस्येमध्ये मासिक पाळीचा क्रम चुकतो. तसेच मासिक पाळीच्या अनियमितपणामुळे गर्भधारणा करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.

PCOS Awareness Month 2023
Besan Ladoo Side Effects : चवीचवीने खाताय बेसनाचा लाडू ठरु शकतो आरोग्यासाठी घातक!

2. एंड्रोजन ओव्हरडोज

एन्ड्रोजन हार्मोन्सच्या उच्च पातळीमुळे चेहऱ्यावर आणि शरीरावर जास्त केस येऊ लागतात. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स (Pimples) येऊ लागतात. जर तुम्हालाही ही लक्षणे दिसत असतील तर पीसीओएसचा त्रास असू शकतो.

3. त्वचेवर डाग

त्वचेचे डाग हे PCOS चे दुसरे मुख्य लक्षण आहे. जर तुम्हालाही PCOS चा आजार जडला असेल तर मानेच्या मागील बाजूस, काखेत आणि स्तनांच्या खाली त्वचेवर गडद किंवा जाड डाग दिसू लागतात.

PCOS Awareness Month 2023
Smart and Intelligent Women : इंटेलिजंट महिलांमध्ये असतात खास गुण, कसे ओळखाल?

4. वजन वाढणे

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ (NIH) नुसार, PCOSने त्रस्त असणाऱ्या महिलांमध्ये वजन वाढण्याची शक्यता अधिक असते. तसेच तुमचे वजन अचानक वाढू लागते.

5. पुरळ किंवा तेलकट त्वचा

PCOS मुळे शरीरातील हार्मोनल बदलांमुळे, शरीरात तेल ग्रंथींमधून स्राव वाढू शकतो, ज्यामुळे मुरुम आणि त्वचेशी संबंधित इतर समस्या होण्याची शक्यता वाढते. पुरूष संप्रेरक एन्ड्रोजनच्या जास्त प्रमाणात महिलांमध्ये मुरुम किंवा तेलकट त्वचा देखील होऊ शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

PCOS Awareness Month 2023
Biggest Ganesh Murti In Mumbai : मुंबईतली सर्वात उंच गणेशमूर्ती पाहिलीत का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com